महात्मा बसवेश्वरांचे समतावादी तत्त्वज्ञान
Abstract
भारतात इसवी सन 12 व्या शतकामध्ये समाजात जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि कर्मकांड प्रधान धार्मिक प्रथा मोठ्या प्रमाणात होती. कर्नाटक राज्यात अशा परिस्थितीत लिंगायत संप्रदाय उदयास आला. या संप्रदायाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी समता दृष्टीत मानवतावादी व नैतिक मूल्यांवर आधारित असणारी समाजरचना मांडली. महात्मा बसवेश्वर हे समाज सुधारक व तत्वज्ञ होते. त्यांच्या विचारातील प्रमुख तत्वे ही अनुभव, नैतिकता आणि सामाजिक समता यावर आधारित होती. त्यांच्या तत्त्वज्ञानात कायक तत्व (श्रम हेच परमपूज्य), दासोह तत्व (निस्वार्थी सेवा, सामूहिक कल्याण), समता व जातीन निरपेक्षता, स्त्री - पुरुष समानता, अनुभव प्रधान अध्यात्म, इस्टलिंगतत्व, नैतिक आचरण धर्म व सामाजिक परिवर्तन या तात्विक संकल्पनांचा समावेश होतो. प्रस्तुत संशोधन पेपर मध्ये बसवेश्वरांच्या समतावादी तत्त्वज्ञानाचे ऐतिहासिक, तात्विक आणि सामाजिक विश्लेषण केलेले आहे. त्याचबरोबर आधुनिक लोकशाही, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या मूल्यांची उपयुक्तता स्पष्ट केली आहे. प्रस्तुत संशोधन पेपरच्या अभ्यास मांडणीने बसवेश्वरांचे तत्वज्ञान हे जसे धार्मिक सुधारणा दर्शविते तसेच ते सामाजिक क्रांतीचे तात्विक अधिष्ठान आहे हे सिद्ध केले आहे.