महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक कार्य

Authors

  • डॉ. प्रकाश बुवाजी पांढरमिसे Author

Abstract

  महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील भारतीय समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि धार्मिक विचारवंत होते. त्यांनी दक्षिण भारतातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील समाजातील कठोर जातिव्यवस्था, अस्पृश्यता, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा आणि कर्मकांडप्रधान धर्मव्यवस्थेने ग्रस्त होता. या विषम सामाजिक रचनेविरुद्ध महात्मा बसवेश्वरांनी समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांवर आधारित नव्या समाजव्यवस्थेची मांडणी केली.

          या संशोधन पेपरमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या सामाजिक कार्याचे तात्त्विक अधिष्ठान, त्यांची कार्यपद्धती आणि समाजावर झालेला परिणाम यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. “कायकवे कैलास” या तत्त्वाद्वारे त्यांनी श्रमाला आध्यात्मिक मूल्य दिले आणि प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिक कायक (श्रम) करून स्वावलंबी जीवन जगावे, असे प्रतिपादन केले. “दासोह” या संकल्पनेतून त्यांनी समाजहित, परस्पर सहकार्य आणि सामायिक जबाबदारी यांना प्रोत्साहन दिले.

       महात्मा  बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या “अनुभव मंटप” या संस्थेमुळे सर्व जाती-धर्मातील स्त्री-पुरुषांना समानतेने विचार मांडण्याची संधी उपलब्ध झाली. ही संस्था वैचारिक लोकशाहीचे प्रतीक मानली जाते. स्त्री-सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांनी स्त्रियांना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समान अधिकार देत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना दिली. आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे आणि अस्पृश्यांशी समतावादी वर्तन करणे ही त्यांच्या कार्यातील क्रांतिकारी पावले होती.

            या अभ्यासातून असे स्पष्ट होते की बसवेश्वरांचे कार्य केवळ धार्मिक सुधारणा नव्हे, तर व्यापक सामाजिक पुनर्रचनेचा प्रयत्न होता. त्यांच्या विचारांत सामाजिक न्याय, नैतिकता आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार दिसून येतो. आधुनिक काळातील संविधानिक समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनांशी त्यांचे तत्त्वज्ञान सुसंगत आहे. त्यामुळे बसवेश्वरांचे सामाजिक कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून आजही ते मानवी समाजाला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरते.

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक कार्य. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/331