संत बसवेश्वरांचे कायक सिद्धांत एक विचार
Abstract
श्री बसवेश्वरांचा जन्म म्हैसूर राज्यातील (कर्नाटक) विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी-इंगळेश्वर गावातील एका सुप्रसिद्ध ब्राह्मण कुटूंबात वैशाख शुद्ध तृतीया, रोहिणी नक्षत्रावर अक्षय्यतृतीयेच्या शुभदिवशी मादलांबिकेच्या दुसऱ्यांदा पुत्ररत्न इ.स. 1125 या दिवशी झाला. (काही अभ्यासकांच्या जन्म नोंदीनुसार 1131, 1134 अशा नोंदी सापडतात.) बसवेश्वरांचे वडील मादिराज यांना कळचुरी कल्याणच्या चालुक्य घराण्याचे मांडलीक राजे यांनी बागेवाडी विभागाचे पुरवराधिश्वर हे पद बसवेश्वरांच्या वडीलांना बहाल केले होते. हा अधिकारी पंचक्रोशीतील बारा गावाचा प्रमुख होत. बसवेश्वरांच्या वडीलांना तीन अपत्य होती. देवराज, नागलांबिका आणि तिसरे अपत्य बसवेश्वर! बसवेश्वरांची आई मादालांबिका ह्या खूप श्रद्धाळू होत्या. बागेवाडीमध्ये एक प्राचीन मल्लीकार्जुनचे शिवमंदिर आहे. प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी, आठ दिशाचे दिकपाल, छतावर मधोमध कोरलेले नटराजाची मुर्ती अशा या कलात्मक शिल्पसौंदर्याने श्रृंगारलेले मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य असे जागृत शिवलिंग. या शिवलिंगासमोर भव्य असे नंदी आहे. आणि हे मंदिर बागेवाडी गावामध्ये होते. हेच मंदिर बसवेश्वरांच्या आईचे श्रद्धास्थान होते. बसवेश्वरांचे आई-वडील दोघेही शैवोपासक होते. म्हणजेच शिवाची उपासना करणारे उपासक होते. बसवेश्वर बाल वयामध्ये ज्याप्रमाणे चंद्रकलेप्रमाणे दिवसा मासी वाढत होता. त्याची बहीण त्याला गावामध्ये फिरवून आणत असे. ती मंदिरातसुद्धा घेवून जात असे. हा बालक गोंडस, सदृढ शरीराचा, मनाने शांत, धीरगंभीर, बुद्धीने अत्यंत तल्लक! त्याची निरीक्षण शक्ती सूक्ष्म होती.