भारतातील सर्व समावेशक वृद्धी आणि दारिद्र्य निर्मूलन

Authors

  • डॉ. मंगल नागोराव मारकड Author

Abstract

सर्व समावेशक वृद्धी ही अशी आर्थिक वाढ आहे की ज्यामध्ये समाजात न्याय पद्धतीने वितरण केले जाते. ज्यामुळे आर्थिक विकासात सर्व घटकांना सहभागी होता येते आणि आर्थिक विकासाचा फायदा मिळवून देण्याची संधी निर्माण होते विशेषतः आर्थिक विकासापासून वंचित घटक आर्थिक विकासात सहभागी होऊ शकतात. त्यातून समान लाभ घेऊ शकतात. अलीकडील काळात जगातील अनेक देशांनी सर्वसमावेशक वृद्धीचे तत्व स्वीकारले आहे. अनेक देशांमध्ये गरिबांसाठी ज्या विविध योजना आखल्या जातात त्या सर्वसमावेशक वृद्धीचाच एक भाग असतात. भारताच्या विविध पंचवार्षिक योजनांच्या उद्दिष्टात सर्व समावेशक वृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्याचा हेतू दिसून येतो. सर्वसमावेशक वृद्धीच्या संकल्पनेत आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत उत्पन्नाच्या विषमते सह सामाजिक वंचिततेला महत्त्व असते. सर्वसमावेशक वृद्धीच्या संकल्पनेत पुढील महत्त्वाच्या कार्यक्रमात घटकांचा समावेश होतो. 1) भौतिक विकास :- यामध्ये देशातील दरडोई उत्पन्न वाढीला महत्त्व असते. 2) मानवी विकास :- यामध्ये मानवाला दिले जाणारे शिक्षण आरोग्याच्या सोयी आणि पर्यावरणीय समतोल मूलभूत सेवा सुविधा पुरविणे याला महत्व दिले जाते. या सर्वांच्या विकासाने सर्वसामावेशक वृद्धीला चालणे मिळते त्याचबरोबर दारिद्र्य ही कमी होण्यास मदत होते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. मंगल नागोराव मारकड

    एम. ए., बी. एड., नेट, सेट, पीएच. डी. ( अर्थशास्त्र ) सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी, जिल्हा सांगली

Published

2025-12-20

How to Cite

भारतातील सर्व समावेशक वृद्धी आणि दारिद्र्य निर्मूलन. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 1043-1047. https://iipublications.com/iipwjhss/article/view/986