“महात्मा बसवेश्वर - समाज परिवर्तनाचे आद्य प्रवर्तक”
Abstract
भारतीय समाजात समानता आणि विश्वबंधूता यांचा पुरस्कार करणार्या सामाजिक परिवर्तनात मोलाचे कार्य करणार्या आद्य प्रवर्तकांमध्ये महात्मा बसवेश्वरांचे नाव आदराने घेतले जाते. बाराव्या शतकातील भारतीय समाज अनेक बुरसटलेल्या विचारांनी, अंधश्रध्दानी, जातीवर्ण व्यवस्था आदि अविचारीपणाने साधलेले कर्मकांड, धर्माचरण या सारख्या बाबींनी ग्रासलेला होता. या सर्व बाबींमुळे सामाजाचा आणि व्यक्तीगत स्तरावर प्रत्येक व्यक्तीचा मानसिक-बौध्दीक विकासाला खीळ बसली होती. समाजाला आणि व्यक्तींना निष्क्रीय करणार्या या बाबी दूर करण्याची आणि त्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन करण्याची गरज असल्याची जाणीव महात्मा बसवेश्वरांना झाली. म्हणूनच त्यांनी आपल्या कार्याद्वारे आणि वचनांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा पुरस्कार केला. बाराव्या शतकातील निष्क्रीय आणि दिशहिन झालेल्या समाजात स्वाभिमान निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. धार्मिक आणि सामाजिक समता निर्माण करणे हे त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. प्रस्तुत अभ्यासाच्या माध्यमातून त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.