महात्मा बसवेश्वर: एक समाजचिंतक

Authors

  • डॉ. संजय तुकाराम वाघमारे Author

Abstract

  भारतीय समाज सुधारणेच्या परंपरेत बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांचे स्थान अत्यंत महत्वपूर्ण आहे. मध्ययुगीन भारतात धार्मिक कर्मकांड, जातीभेद, अस्पृश्यता आणि स्त्री- दमन यांचा समाज जीवनावर मोठा प्रभाव होता. अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत बसवेश्वरांनी मानवतावाद, समता आणि श्रम प्रतिष्ठेचा पुरस्कार करून एक व्यापक सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. त्यामुळे ते केवळ धार्मिक संत किंवा तत्वज्ञ नव्हे, तर एक क्रांतिकारी समाजचिंतक होते. बसवेश्वरांनी 'कायक'( श्रमाधिष्ठित जीवन) आणि  'दासोह' (सामूहिक वाटप) या तत्वावर आधारित सामाजिक व्यवस्था मांडली. त्यांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून सर्व स्तरांवरील स्त्री-पुरुषांना मुक्त विचार मंथनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या वचन साहित्यातून व्यक्त झालेली समतावादी, लोकाभिमुख आणि नैतिक मूल्यावर आधारित विचारसरणी आजच्या लोकशाही व सामाजिक न्यायाच्या तत्वांशी सुसंगत दिसून येते.

           संशोधनात प्राथमिक स्त्रोत म्हणून वचनसाहित्य, शिलालेख व समकालीन नोंदीचा उपयोग करण्यात येईल.  तर दुय्यम स्त्रोतांमध्ये इतिहास ग्रंथ, संशोधन निबंध आणि समीक्षनात्मक लेखनाचा आधार घेतला जाईल.

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

महात्मा बसवेश्वर: एक समाजचिंतक. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/339