महात्मा बसवेश्वरांची समाजक्रांती: एक ऐतिहासिक आणि वैचारिक पुनर्मूल्यांकन
Abstract
भारतीय समाज मनाच्या जडणघडणीत १२ वे शतक हा एक क्रांतीकारी उषःकाल मानला जातो. या कालखंडात कर्नाटकच्या भूमीवर उदित झालेली महात्मा बसवेश्वरांची विचारप्रणाली केवळ एका धार्मिक पंथाची स्थापना नव्हती, तर ती प्रस्थापित विषमतेच्या आणि जड कर्मकांडांच्या विरोधात पुकारलेले एक महान वैचारिक युद्ध होते. ज्या काळात वर्णव्यवस्था, जातिभेद आणि बाह्य डामडौलाने मानवी प्रतिष्ठा पायदळी तुडवली होती, त्या काळात बसवण्णांनी 'माणूस' आणि 'विवेक' केंद्रस्थानी ठेवून क्रांतीचा नवा आराखडा मांडला.
या शोधनिबंधाचा उद्देश बसवेश्वरांची समाजक्रांती एक ऐतिहासिक आणि वैचारिक पुनर्मूल्यांकन यांचा अभ्यास करणे हा आहे संशोधनात प्राथमिक साधने म्हणून बसवेश्वरांचे वाचन साहित्य, समकालीन शरणांचे वचन आणि द्वितीय साधने म्हणून इतिहास ग्रंथ संशोधन, निबंध व प्रबंध, समाजशास्त्रीय तत्वज्ञान विषयक अभ्यास यांचा आधार घेतला जाईल. हा शोध निबंध बसवेश्वरांच्या या बहुआयामी समाजक्रांतीचा, त्यांच्या वचनांच्या (कवितांच्या) आधारे सविस्तर आढावा घेतो. प्रस्तुत शोधनिबंधात त्यांच्या समाजक्रांतीचे ऐतिहासिक व वैचारिक पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला आहे.