महात्मा बसवेश्वर : समतावादी व मानवतावादी विचारांचा सखोल अभ्यास

Authors

  • अश्विनीकुमार सखाराम साबळे Author

Abstract

या शोधनिबंधात १२व्या शतकातील समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्या काळातील वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि धार्मिक कर्मकांड यांमुळे समाजात प्रचंड विषमता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत बसवेश्वरांनी समता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्याय यांवर आधारित तत्त्वज्ञान मांडले. “कायकवे कैलास” या तत्त्वाद्वारे त्यांनी श्रमाला दैवी स्थान दिले, तर “दासोह” संकल्पनेद्वारे संपत्तीचे समाजहितार्थ वाटप सुचविले.

बसवेश्वरांनी स्थापन केलेले अनुभवमंडप हे लोकशाहीवादी विचारमंथनाचे केंद्र होते. येथे सर्व जाती-धर्म आणि स्त्री-पुरुषांना समान संधी मिळाली. त्यांच्या वचनसाहित्यातून सामाजिक समता, स्त्रीसमानता, नैतिकता आणि अंतर्मुख भक्ती यांचा प्रभावी संदेश दिला गेला. त्यांनी मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांचा विरोध करून वैयक्तिक अध्यात्मावर भर दिला.

या अभ्यासातून असे स्पष्ट होते की बसवेश्वरांचे विचार आधुनिक लोकशाही, मानवाधिकार आणि समाजवादाच्या तत्त्वांशी सुसंगत आहेत. त्यांनी सामाजिक क्रांतीची बीजे रोवून भारतीय समाजाच्या परिवर्तनाला दिशा दिली. त्यामुळे बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान आजही समकालीन संदर्भात अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरते.

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

महात्मा बसवेश्वर : समतावादी व मानवतावादी विचारांचा सखोल अभ्यास. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/350