बसवेश्वर : स्त्री-मुक्ति एक मध्ययुगीन संकल्पना

Authors

  • डॉ. उद्धव नरहरी कांबळे Author

Abstract

स्त्रीमुक्ति, स्त्रीमुक्त्ति चळवळ, स्त्रीमुक्ति आंदोलन इत्यादी शब्दप्रयोग अलिकडे सर्रास केले जात आहेत. तथापि या संकल्पना, ही चळवळ फार जुनी आहे. भारतीय समाजव्यवस्थेत तर या संकल्पनांना या चळवळींना तसेच त्यांच्या प्रयत्नांना मध्ययुगापासून म्हणजे १२ व्या शतकापासून विशिष्ट पार्श्वभूमी लाभलेली आहे. यावर भाष्य करताना डॉ. सरोजिनी शिंत्री म्हणतात, "अनेक समाजसुधारकांनी स्त्रियांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक हक्कांबद्दल प्रयत्न केले; परंतु धार्मिक क्षेत्रातसुद्धा त्यांना हक्क मिळावा म्हणून कोणी विशेष प्रयत्न केले नाहीत. केवळ बसवेश्वरांनीच हे जाहीर केले की स्त्रियांसुद्धा धार्मिक क्षेत्रात पुरुषांइतक्याच हक्कदार आहेत. आजही स्त्रियांवर जेथे अनन्वित अत्याचार होतात, तेथे त्या काळी बसवेश्वरांनी स्त्रियांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी केवढा प्रखर लढा दिला असेल याची कल्पना येते. सर्व क्षेत्रांत स्त्रिया यशस्वी होऊ शकतात, हे सिद्ध झाले. काही क्षेत्रांत त्या पुरुषांपेक्षा काकणभर सरस ठरतात हेही सिद्ध झाले आहे. बसवेश्वरांनी हे जाणले होते; म्हणूनच स्त्रीमुक्तिची चळवळ त्यांनी सुरू केली आणि त्यात ते यशस्वीही झाले

Downloads

Download data is not yet available.

Published

2026-03-19

How to Cite

बसवेश्वर : स्त्री-मुक्ति एक मध्ययुगीन संकल्पना. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/372