सामाजिक एकता आणि बसवेश्वरांचे विचार
Abstract
मानवी संस्कृतीचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे धर्म, मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक सुधारणा घडवून आणल्या पण मानवाला वाटत राहिले की, निसर्गातील दिव्य शक्तीना नियंत्रीत करणारी कुणीतरी श्रेष्ठ आहे आणि या संकल्पनेतून धर्मकल्पना पुढे आल्या. यातील बसवेश्वराच्या सामाजिक आणि आर्थिक कार्याचा शोध आपण या प्रकरणात घेणार आहोत. वीरशैव म्हटले की आपणाला बसवेश्वर आठवतात. आणि बरेच जन बसवेश्वरांना वीरशैव धर्माचे संस्थापक मानतात. तसे तर लिंगायत समाज मूळ द्रविडीयन आहे आणि यांच्या ही पुढे वीरशैव धर्म हा आर्याच्या पूर्वीपासून इथे अस्तित्वात होता. मोहंजोदडो आणि हडप्पा येथील उत्खननात त्याच्या काही खुना आपणाला सापडतात, म्हणजे त्या अगोदर ही वीरशैव धर्म अस्तित्वात होता. फक्त महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात या वीरशैव तत्वाचे पुनर्जीविन केले म्हणून महात्मा बसवेश्वाराना वीरशैव समाज आपले दैवत मानतो. बसवेश्वरांनी स्त्री-पुरुष असा भेद कधीच केला नाही किंवा जाती-पातीची बंधने पाळली नाहीत, म्हणून त्यांनी सामाजिक ऐक्याचा नारा जो दिला तो त्या काळात महत्वपूर्ण होता.