संत महात्मा बसवेश्वरांचे विचार
##article.abstract##
गौतम बुद्धानंतर 1800 वर्षांनी व सम्राट अशोका नंतर सुमारे 1550 वर्षांनी मध्ययुगात 12 व्या शतकात बसवेश्वर हे एक महान कवी, समाज सुधारक आणि वचन साहित्याचे प्रवर्तक म्हणून उदयास आले. दक्षिण पथात 'बसव': युग म्हणून ओळखले जाते त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि सामाजिक समतेचा प्रचार केला. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात 1131 साली जन्मलेल्या बसवेश्वराने प्राचीन लोकशाही गणराज्याची परंपरा अधिक उन्नत आणि विकसित केली . बसवादी शरणांनी भारतीय लोकशाहीची परंपरा समृद्ध करत कर्नाटकात बाराव्या शतकात सामाजिक, धार्मिक व साहित्यिक क्रांती घडविली. राजकारण आणि धर्मकारण हे एकाच वेळी यशस्वी रितीने साध्य करणे शक्य आहे हेही दाखवून दिले. महात्मा बसवेश्वरांची तत्त्वे ही केवळ धार्मिक नसून ती सामाजिक क्रांतीची पाया होती त्यांनी मांडलेली सूत्रे आजही आधुनिक लोकशाही आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रगत मांडली जातात.