सामाजिक, आध्यात्मिक समतेचे प्रनेते : महात्मा बसवेश्वर

##article.authors##

  • प्रो.डॉ.जनार्धन दामू परकाळे ##default.groups.name.author##

##article.abstract##

म. बसवेश्वर म्हणजे कर्मठांच्या चातुर्वर्ज्याच्या चिरेबंदी बुरुजांवर हल्ले करणारा पहिला बिनीचा सरदार. समतेची मंगलप्रभा पसरविणारा तेजोनिधी, स्त्रियांना मुक्तीचे पंख देऊन अवकाशात भरारी मारायला लावणारा स्त्रीउद्धारक, उपेक्षितांच्या अंतरंगात आत्मविश्वास जागविणारा मुक्तिदाता, अस्पृश्यांच्या गळ्यातील मडकी फोडणारा, कमरेभोवतीचा खराटा काढून परंपरेच्या बेड्या तोडणारा अस्पृश्योद्धारक, स्त्री-शूद्रांना अनुभव मंटपाच्या विचारपीठाद्वारे, दाबलेले दुःखाचे कढ उघडे करण्याचे स्वातंत्र्य बहाल करणारा युगपुरुष, लोकांना स्वर्ग-नरकाच्या काल्पनिक फसव्या मोहजालातून वास्तवाच्या दुनियेत घेऊन येणारा जीवनदाता म्हणजे म. बसवेश्वर. समाजसुधारणेच्या क्षेत्रातील स्वयंभू उत्तुंग हिमालयच.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submissions.published##

2026-03-19