मराठी कादंबरीतील : देवदासींच्या व्यथा व वेदना
Keywords:
देवदासी प्रथा मराठी कादंबरी स्त्रीशोषणAbstract
राठी कादंबरी परंपरेने समाजातील सत्यस्थिती, सामाजिक अन्याय आणि मानवी दुःखाचे वास्तववादी चित्रण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. या परंपरेत देवदासी प्रथा हा एक अत्यंत ज्वलंत, वेदनादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाचा विषय राहिला आहे. देव, धर्म आणि रूढीपरंपरांच्या नावाखाली स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही प्रथा मराठी कादंबऱ्यांमध्ये विविध अंगांनी उलगडली गेली आहे.
डॉ. राजन गवस यांच्या ‘चौंडक’ व ‘भंडारभोग’ तसेच उत्तम कांबळे यांच्या ‘देवदासी आणि नग्न पूजा’ या साहित्यकृतींमध्ये देवदासींचे सामाजिक स्थान, आर्थिक दारिद्र्य, मानसिक दडपण, लैंगिक शोषण, अपमान आणि जीवनातील असुरक्षितता यांचे अत्यंत वास्तववादी चित्रण दिसून येते. देवदासींच्या बालपणापासून त्यांच्या जगण्यातील भोगवस्तू बनण्यापर्यंतचा प्रवास लेखकांनी तितक्याच संवेदनशीलतेने उभा केला आहे.
या संशोधनात्मक लेखाचा उद्देश देवदासींच्या व्यथा-वेदना, त्यांच्या जीवनपरिस्थिती, समाजाकडून होणारी अवहेलना, चळवळींमुळे झालेली जागृती आणि कादंबरीकारांनी केलेले साहित्यिक सादरीकरण यांचा चिकित्सक अभ्यास करणे हा आहे. साहित्य आणि समाजातील नात्याच्या अनुषंगाने या कादंबऱ्या समाजातील अमानुष प्रथा, स्त्रीजीवनाची होरपळ आणि माणूसकीची झालेली हानी यांचे दाहक वास्तव अधोरेखित करतात. त्यामुळे देवदासींच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारे मराठी कादंबरीचे दालन हे एका सामाजिक दस्तऐवजाप्रमाणे महत्वाचे ठरते.
Downloads
References
१) चौंडक - डॉ. राजन गवस
(मेहता पब्लिशिंग हाऊस)
२) भंडारभोग - डॉ. राजन गवस
(मेहता पब्लिशिंग हाऊस)*
३) देवदासी आणि नग्न पुजा - उत्तम कांबळे
(प्रकाश विश्वासराव लोकवाड्:मयगृह, मुंबई)
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.