अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात सेवाभावी

Authors

  • प्रा. सुरेखा रामदास लगड Author
  • डॉ. संभाजी सोपानराव दराडे Author

Keywords:

कृषी परिवर्तन, ग्रामीण विकास, डिजिटल शेती, हवामान बदल, शाश्वत विकास, जागतिकीकरण, भारतीय कृषी

Abstract

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण सर्वांगीण विकास प्रक्रियेत सेवाभावी संस्था (Non-Governmental Organizations) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.या जिल्ह्यातील ग्रामीण भाग आजही दारिद्र्य, निरक्षरता, बेरोजगारी, आरोग्य सुविधांचा अभाव आणि सामाजिक विषमता अशा बहुआयामी समस्यांनी ग्रस्त आहे. शासनयंत्रणा व्यापक असली तरी प्रशासनातील गुंतागुंत, निधीची मर्यादा व योजनांची असमान अंमलबजावणी यांमुळे अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. विशेषतः महिला, अनुसूचित जाती-जमाती व भटक्या-विमुक्त समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर सेवाभावी संस्था स्थानिक गरजांनुसार लवचिक, सहभागी व लोकाभिमुख पद्धतीने हस्तक्षेप करून ग्रामीण समस्यांवर उपाय शोधतात. प्रस्तुत संशोधनात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, उपजीविका, सामाजिक न्याय व मानवी हक्क या क्षेत्रांतील सेवाभावी संस्थांच्या भूमिकेचे विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कार्यपद्धती, मर्यादा व भविष्यातील संधींचा शैक्षणिक दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • प्रा. सुरेखा रामदास लगड

    (पीएच.डी. संशोधक विद्यार्थी), संशोधन केंद्र - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई,

  • डॉ. संभाजी सोपानराव दराडे

    इतिहास विभाग प्रमुख,

Published

2025-12-20

How to Cite

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण विकासात सेवाभावी. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2111-2116. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1110

Similar Articles

11-20 of 235

You may also start an advanced similarity search for this article.