सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका- एक अभ्यास

Authors

  • विजायकुमार शंकरराव पवार Author

Keywords:

सामाजिक परिवर्तन महिलांची भूमिका

Abstract

सामाजिक परिवर्तन सतत घडणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे आदिम काळापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत सामाजिक परिवर्तन घडत आले आहे .कुटुंब व्यवस्था, अर्थव्यवस्था, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरण, व तंत्रज्ञान या क्षेत्रातील परिवर्तनात महिलांनी मोठे योगदान दिले आहे. परिणामी समाजात व्यापक बदल घडत आहे. हा अभ्यास भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहरातील वागळे इस्टेट विभागातील मर्यादित आहे. या अभ्यासात पर्यावरण, राजकारण, आर्थिक सशक्तिकरण, सांस्कृतिक अदान प्रदान ,आधुनिक तंत्रज्ञान या संदर्भात महिलांच्या सहभागातून होणारे सामाजिक परिवर्तन यांचे विश्लेषण केले आहे, यातून सद्यस्थितीत सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका समजून घेतली आहे. या संशोधनासाठी 10 महिलांचा नमुना निवडून प्रश्नावलीचा वापर केला आहे. या सर्व महिला विवाहित असून शहरी विभागातील आहेत. या अभ्यासातून दिसून आले की सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका अधिक बळकट झाली आहे .शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, पर्यावरण जागृती ,सामाजिक व सांस्कृतिक भूमिका, राजकीय जाणीव व तंत्रज्ञानाचा वापर यामुळे महिलांचा आत्मविश्वास, निर्णय क्षमता, जबाबदारी, सांस्कृतिक महत्त्व ,व स्त्री पुरुष समानता वाढण्यास मदत झाली आहे. तसेच आणखी सुधारणा व्हावी म्हणून काही अभ्यासपूर्ण सूचना सुचवल्या आहेत. या संशोधनात प्रामुख्याने सकारात्मक बदलांचा अभ्यास केला आहे

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • विजायकुमार शंकरराव पवार

    संशोधक विद्यार्थी, इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Published

2025-12-20

How to Cite

सामाजिक परिवर्तनात महिलांची भूमिका- एक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 807-812. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1077

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.