नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी आणि नवीन शैक्षणिक धोरण नसलेल्या विद्यार्थ्यांमधील भावनिक बुद्धिमत्तेचा तुलनात्मक अभ्यास
Abstract
डॉ. मुजुमदार म्हणतात “ज्या देशाची शिक्षण व्यवस्था चांगली असते, तो देश विकसित असतो. ज्या देशात ज्ञानसंपदा असते, तो देश जगाच्या केंद्रस्थानी असतो.” बऱ्याच वर्षा नंतर आमलात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र असे सकारात्मक बद्दल होत आहे. हे शैक्षणिक धोरण (NEP 2020) प्राथमिक अवस्थेत आहे, पण असे असले तरीही या मध्ये केद्रीभूत असण्याऱ्या विद्यार्थ्याचे सर्वागीण विकास म्हणजे भावनिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केला गेलेला आहे. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याचे भावनिकदृष्ट्या (मानसिक), शारीरिकदृष्ट्या, आणि सामजिकदृष्ट्या परिसीमिय क्षमतेपर्यंत विकास करणे होय. भानिक बुद्धिमत्ता आणि सामजिक बुद्धिमत्ता यांचा शैक्षणिक यश आणि त्यांचे परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या जीवनातील यशाशी खूप जवळचा सहसंबध आहे. भावनिकदृष्ट्या निरोगी असणाऱ्या विद्यार्थ्यांची कार्याची गुणवत्ता सकारात्मक असते. असे विद्यर्थी त्यांच्या घरातील, शाळेमधील आणि सामाजिक कार्ये सकारात्मकपणे करू शकतात. भावनिक बुद्धिमत्ता उत्तम असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्याचे अंतर्गत आणि बाह्य मुल्ये आणि नियंत्रण यांची उत्तम जाण असते. विद्यार्थी त्यांचे बरेच सक्रिय वेळ शाळेत घालवतात, त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणा मधील असणाऱ्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याच्या भावनिक आणि सामजिक बुद्धीमत्तेकडे आणि चौफेर व्यक्तिमत्व निर्मितीकडे विशेष लक्ष दिलेले आहे. या संशोधनात दोन शैक्षणिक धोरणातील असणऱ्या विद्यार्थ्यांचे भावनिक बुद्धीमत्तेमधील असणारे फरक शोधण्यावर भर दिला आहे.