संत बसवेश्वरांच्या आर्थिक तत्वांचा अभ्यास
Abstract
महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि अर्थचिंतक संत बसवेश्वर (इ.स.११३१-११६७ कर्नाटक) यांनी १२ व्या शतकामध्ये सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी विचार मांडले. त्यांनी आर्थिक विचारांमध्ये समानता, संपत्तीचे वितरण, श्रमाचा सन्मान, व सामाजिक न्यायावरती भर दिला आहे. त्यांच्या आर्थिक तत्वांमागे मुख्य आधार ‘कायक’ (श्रमाचा सन्मान) आणि ‘दासोह’ (सामाजिक वितरण) होता. यामध्ये श्रमाला उच्च स्थान, समानता, न्याय वितरण, नैतिक अर्थव्यवस्था, आणि स्वावलंबन यांचा समावेश केला आहे. या संकल्पनांवर आधारित श्रम आणि सामाजिक न्यायाचा आदर्श ठेवून संत बसवेश्वरांचे आर्थिक तत्व आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेमध्येही अत्यंत मोलाचे व उपयुक्त ठरतात. या शोधनिबंधात आपण संत बसवेश्वरांच्या आर्थिक तत्वांचा विस्तृत अभ्यास करणार आहोत.
Downloads
Download data is not yet available.
Downloads
Published
2026-03-19
Issue
Section
Articles
How to Cite
संत बसवेश्वरांच्या आर्थिक तत्वांचा अभ्यास. (2026). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 2(Issue - I (January-March). https://iipublications.com/iipwjhss/article/view/347