भारतीय कृषी व्यापार आणि शाश्वत विकास

Authors

  • डॉ. मच्छिंद्र दामाजी वेदपाठक Author

Keywords:

पुरवठा साखळी, शाश्वत विकास

Abstract

जगातील सर्वच देश कृषी वस्तूंच्या निर्यातीमध्ये  वाढ करण्याचा प्रयत्न करीत आहेत.यासाठी देशांतर्गत कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. परंतु कृषी क्षेत्रात वाढत चाललेल्या आर्थिक गतीविधीमुळे कार्बनडाय ऑक्सइड आणि हरितगृह वायूंचे  प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी जागतिक तापमानात वाढ होऊन कृषी उत्पादनावर नकारात्मक परिणाम होत आहे.त्यामुळे जगात कृषी उत्पादनात वाढ करूनही भुकेलेल्या लोकांचे प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात कमी झाले नाही. जागतिक भूक निर्देशांक २०२४ नुसार भारताचा १२७  देशामध्ये १०५ वा  क्रमांक आहे.जे अत्यंत विरोधाभासाचे चित्र दर्शवीत आहे.कारण अन्नधान्याचे उत्पादन वाढत असताना भारतात उपासमारीत जीवन जगणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे जे नक्कीच शाश्वत विकासाचे लक्षण नाही. त्यात भारतामध्ये अन्नधान्याची नासाडी अधिक प्रमाणात होत आहे.प्रस्तुत संशोधनात अलीकडील कालावधीत जागतिक स्तरावर बदलत चाललेल्या आर्थिक आणि राजकीय वातावरणामुळे कृषी मालाच्या  पुरवठ्याच्या  साखळीत व्यत्यय  निर्माण होत आहे. परिणामी भारतासारख्या विकसनशील आणि इतर मागासलेल्या देशात अन्नधान्याच्या  कमतरतेमुळे  निर्माण  झालेल्या अन्न सुरक्षिततेचा प्रश्नावर प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर  कृषी विकासामुळे पर्यावरणावरती होणाऱ्या परिणामांची आणि कृषी क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या शाश्वत विकासाची चर्चा केली आहे.                  

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. मच्छिंद्र दामाजी वेदपाठक

    सहाय्यक प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख,

    सांगोला महाविद्यालय, सांगोला (महाराष्ट्र)

References

१ . Ashoka K and Bhat B.Jayarama(2025) Sustainable Development of Agriculture in India-Need for Organic Farming,International Journal for Multidisciplinary Research, vol.7 Issue 2

२ . Arpita Mukherjee, Anushka Pal, Ketaki Gaikwad (2024) Sustainable Food Systems and India’s 3dTrade Agreements, ICRIER, Policy Brief #25

३ . S. Rajeswari and other (2024) Agricultural Production, Trade Balances and Sustainable Development in India: An Analytical Study, Intelligent Systems, Business, and Innovation Research (pp.111-119)

४ . Yadav Swati and Mahima (2022) Environmental Sustainability and Agribusiness in India, international journal of all research education and scientific methods vol.10 issue 4

५ . Kumar Anuj, Meena Sonal, Kumar Sunil and Rana Riya (2022) Sustainable agricultural development in India: An overview, International Journal of Agriculture Extension and Social Development Volume 5; Issue 1 Page No. 118-121

६ . Will Martin (2017) Agriculture trade and food security, ADBI Working paper series 664

७ . Datta G. and Nag B. (2024) Indian Economy, 73 edition, S. Chand publishing, U.P.

८ . इटले डी. एस. (२०१७) भारतीय कृषी विकास व शाश्वत शेतीची गरज:एक चिकित्सक अभ्यास ,Review of research .vol.6,issue-4 pp.1-4

९ . Hoda Anwarul and Gulati Ashok (2013) India’s Agricultural Trade Policy and Sustainable Development. ICTSD, Issue Paper No. 49

१० . https://www.mospi.gov.in/

११ . https://agriwelfare.gov.in/en/MinistersOffice

१२ . https://www.iea.org/countries/india/emissions

१३ . https://www.globalhungerindex.org/

Published

25-10-2025

How to Cite

डॉ. मच्छिंद्र दामाजी वेदपाठक , trans. 2025. “भारतीय कृषी व्यापार आणि शाश्वत विकास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 2 (Issue - IV (October-December): 10. https://iipublications.com/iipimrj/article/view/145.

Share

Similar Articles

41-50 of 104

You may also start an advanced similarity search for this article.