भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कापसे गणपती रामचंद्र आणि कापसे रुक्मिणी गणपती यांचे योगदान

Authors

  • जाधव वैष्णवी नानासाहेब Author

Keywords:

भारतीय स्वातंत्र्य

Abstract

ब्रिटीशांच्या जुलुमाने त्रस्त झालेल्या जनतेला महात्मा गांधी यांच्या रुपाने मोठा आधार मिळाला होता. भारतातील जनता महात्मा गांधी यांच्या एका आदेशाने आंदोलनात सहभागी होत होती. साल 1930 रोजी गांधीजीने सविनय कायदेभंग चळवळ सुरु केली होती. साताऱ्यातील येडे मच्छींद्रगड या गावाचे नाना पाटील ब्रिटीश सरकाराच्या काळात तलाठी म्हणून नोकरी करीत होते. त्यांना समाजकार्याची आवड होती. देश गांधीजींच्या नेतृत्वाने भारावलेला होता. त्यांनी तलाठी पदाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र लढ्यात सहभागी झाले. त्यांच्यावर सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहु महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला त्यानंतर ब्रिटीश राजवट झुगारुन त्यांनी नीरा नदीकाठापासून, वारणा नद्यांच्या खोऱ्यात 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार स्थापन केले. ‘पत्री सरकार’ जुलुम करणाऱ्यांच्या पायात पत्रे ठोकते अशीही अफवा त्याकाळी पसरली होती. काय होते पत्री सरकार आणि त्यांनी ब्रिटीशांचे जगणे कसे हराम केले. अडीचशेहून अधिक गावात त्यांचे पत्री सरकार होते. तेथे ब्रिटीश सरकारचा कोणताही आदेश न पाळता गावांचा स्वतंत्र कारभार चालायचा. क्रांतीसिंह नाना पाटील यांचे वक्तृत्व चांगले होते. त्यांना गावकऱ्यांना ब्रिटीशांविरोधात लढण्यासाठी तयार केले. प्रति सरकारच्या माध्यमातून त्यांनी दरोडेखोर, सर्वसामान्यांना छळणारे सावकार, जुलुमी ब्रिटीश अधिकारी आणि गावगुंड यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वत:चे ‘तुफान सेना’ नावाचे सैन्य दल निर्माण केले होते. सरकारी खजिना लुटणे, पोस्ट सेवांवर हल्ला करणे, रेल्वेवर हल्ला करणे अशा प्रकारे त्यांनी ब्रिटीश सरकारला सळो की पळो करुन सोडले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • जाधव वैष्णवी नानासाहेब

    संशोधक विद्यार्थी, एम. ए. द्वितीय वर्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

Published

20-12-2025

How to Cite

नानासाहेब जाधव वैष्णवी , trans. 2025. “भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कापसे गणपती रामचंद्र आणि कापसे रुक्मिणी गणपती यांचे योगदान”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 841-48. https://iipublications.com/iipimrj/article/view/766.

Share

Similar Articles

31-40 of 103

You may also start an advanced similarity search for this article.