सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पिक प्रारूप आणि सिंचन क्षेत्राचा एक भौगोलिक अभ्यास
Keywords:
सिंचन क्षेत्र, पिक उत्पादनAbstract
कोणत्याही कृषी प्रदेशातील पिक प्रारूप हे त्या प्रदेशाचे कृषी धोरण स्पष्ठ करत असते. थोडक्यात पिक प्रारुपावर तेथील हवामानाचा, प्राकृतिक रचनेचा परिणाम होत असतो. त्यामुळे वैशिष्ठेपूर्ण प्रदेशात वैशिष्ठेपूर्ण पिक-प्रारूप आढळते. काही विशिष्ठ पिके त्या प्रदेशाची मुख्य पिके म्हणून ओळखली जातात. प्रारूप (cropping pattern) म्हणजे एखाद्या शेतजमिनीवर कोणत्या पिकांची आणि कोणत्या क्रमाने लागवड केली जाते याचे नियोजन होय कि ज्यामध्ये हवामान, मातीचा प्रकार, पाणी उपलब्धता आणि बाजारपेठेची मागणी या घटकांचा विचार करून पिकांची निवड केली जाते. याचा मुख्य उद्देश जमिनीची सुपीकता टिकवणे, तण आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे तसेच कमी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करणे हा असतो. शेतकरी पिक प्रारूपामध्ये एकाल पिक पद्धत, बहूपिक पद्धत किंवा पिक फेरपालट पद्धत अवलंबतात. सिंचन क्षेत्र म्हणजे शेतजमिनीचा असा भाग जिथे पिकांना वाढीसाठी पावसाव्यतिरिक्त कृत्रिमरित्या पाणी पुरवले जाते. हे क्षेत्र विशिष्ट सिंचन प्रकल्पांतर्गत येते, जसे की कालवे किंवा विहिरींमधून पाणी दिले जाते. सिंचन क्षेत्र हे जमिनीचे असे क्षेत्र आहे, ज्याला सिंचन व्यवस्थेद्वारे पाणी मिळते आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची पूर्तता केली जाते.
प्रस्तुत संशोधन लेखांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या अधिपत्याखाली असणारी भूधारण क्षेत्र, पिक प्रारूप व्यवस्थापन , त्यांचे सिंचन क्षेत्र क्षमता, सिंचन तीव्रता याचा अभ्यास केला जाणार आहे.
Downloads
References
१) Socio economic Abstract of Solapur District.
२) A New geography of Maharashtra : Afzal Sharieff , Massod Ali Khan, A. Balakishan.
३) Geography of Maharashtra –Dr. S. M. Bhamare.
४) Census of Maharashtra.
५) Economic Review of Maharashtra
६) Agricultural Geography- Masjid Hussain
७) डॉ. अंकुश शंकर शिंदे श्री धूळोबा बाळू वाघमोडे “कृषी भू-धारण क्षेत्र आणि सिंचन क्षेत्राचा भौगोलिक अभ्यास : विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांचा एक नमुना अभ्यास” International Journal of Advance and Applied Research (IJAAR) Impact Factor – 7.328 ISSN – 2347-7075 , Vol.4, Issue Dec 202
८) Shri Shinde A.S. 2017, “ Cropping Pattern & Irrigation Status of Marginal Agricultural Cultivators” Published in WIZCRAFT Publication & Distribution Pvt Ltd. ISBN NO 978-93-86013-43-9 held at Mandrup dated 18th Feb 2017.
९) Shri Shinde A.S. 2013, “The Demographic Characteristics of Scheduled Caste populations in Solapur district.” Published in ‘Review of Research’ International Online Multidisciplinary Journal Vol 3, Issue 1, Oct 2013 2.1002(UIF) 2249-849X
१०) Shri Shinde A.S. “Disparity Level in Agricultural Development in Solapur District” Special issue of an International Scholarly Research Journal for Interdisciplinary studies, 30 Jan 2018 SJIF (2016)-6.177 ISSN 2349-4766(P), 2278-8808(E)
११ ) डॉ. अंकुश शंकर शिंदे श्री धूळोबा बाळू वाघमोडे June 2024 “धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिक प्रारूप आणि सिंचन क्षेत्राचा एक भौगोलिक अभ्यास” published in International Journal of Advance And Applied Research , Impact Factor -7.38 ISSN 2347-7075 , Volume-5, No-20
Downloads
Published
Issue
Section
License

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial 4.0 International License.