मराठा साम्राज्याच्या काळातील पारनेर तालुका: वाडे व गढींचा अभ्यास

Authors

  • डॉ. के. एल. गिरमकर Author
  • मच्छिंद्र नाथा बेलोटे Author

Keywords:

मराठा साम्राज्य पारनेर तालुका वाडे

Abstract

पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक वाडे व गढी मराठा साम्राज्याच्या काळातील वास्तुशास्त्र, प्रशासन आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत उदाहरण आहेत. जामगावचा महादाजी शिंदे वाडा, सुपे पवार गढी, अळकुटी कदमबांडे वाडा, जवळे सोमवंशी वाडा, कान्हूरपठार नारो अभ्यंकर वाडा आणि पळशीकर वाडा यांसारख्या वास्तूंपासून सैन्यसज्जता, वास्तुशास्त्रीय कौशल्य, धार्मिक व सांस्कृतिक समावेश याचे स्पष्ट दर्शन होते. या अभ्यासात ऐतिहासिक दस्तऐवज, क्षेत्रीय निरीक्षण व स्थानिक इतिहासतज्ञांच्या माहितीचा आधार घेऊन या वाड्यांची रचना, बांधकाम शैली, तटबंदी, बुरुज, नक्षीकाम, काष्ठशिल्प आणि धार्मिक देवालये यांचा अभ्यास केला आहे. निष्कर्ष दर्शवितात की या वाड्यांमध्ये उत्तर हिंदुस्तानी शैली, भक्कम तटबंदी, कलात्मक नक्षीकाम आणि प्रशासन व धार्मिक कार्य यांचा उत्कृष्ट संगम आहे. या वास्तूंचा इतिहास जतन करणे, सांस्कृतिक वारसा टिकवणे आणि शैक्षणिक तसेच पर्यटन दृष्ट्या त्यांचा उपयोग करण्याची गरज या अभ्यासातून अधोरेखित होते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • डॉ. के. एल. गिरमकर

    संशोधन मार्गदर्शक, न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज(स्वायत), अहिल्यानगर

  • मच्छिंद्र नाथा बेलोटे

    संशोधक विदयार्थी, न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज(स्वायत), अहिल्यानगर

References

शिंदे, माधवराव. (1956). जामगाव महादाजी शिंदे वाडा: ऐतिहासिक अहवाल आणि स्थापत्य  अभ्यास. (पु.स्.). पुणे: स्थानिक इतिहास विभाग. पवार, कृष्णाजी. (1995). सुपे गढी आणि पुणे जिल्ह्याचा इतिहास. नगर: नगर जिल्हा संग्रहालय प्रकाशन. कदमबांडे, कमळाजी सिधोजीराव. (2002). अळकुटी वाडा आणि पेशवाई काळीन वाड्यांचा अभ्यास. अहमदनगर: इतिहास संशोधन संस्था. सोमवंशी, आनंदराव. (2010). जवळे वाडा: मराठा साम्राज्याचा वारसा. पुणे: मराठी ऐतिहासिक ग्रंथालय. नगरकर, नारो बाबजी. (2005). कान्हूरपठार सरकारवाडा आणि स्थापत्यशास्त्र. नगर: स्थानिक पुरातत्त्व विभाग. पळशीकर, रामराव. (2015). पळशी वाडा आणि सांस्कृतिक वारसा. पारनेर: पारनेर तालुका इतिहास समिती. नाईक, बर्हिजी. (2000). हंगे गढी आणि शिवाजी महाराजांचा लष्करी इतिहास. पुणे: मराठा सैन्य इतिहास ग्रंथालय. जोशी, रा. (2012). मराठा किल्ले आणि महाराष्ट्रातील वास्तुकला. पुणे: सह्याद्री प्रकाशन. देशमुख, वि. (2008). अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके. अहमदनगर: जिल्हा कोषागार प्रकाशन. कुलकर्णी, स. (2010). पारनेर तालुक्यातील वास्तुशिल्प वारसा. पुणे: मराठा सांस्कृतिक संशोधन केंद्र. पाटील, म. (2005). मराठा साम्राज्याचे संरक्षण व वास्तुशिल्प. मुंबई: मुंबई विद्यापीठ प्रकाशन. रानडे, अ. (2015). ऐतिहासिक वाड्यांमधील धार्मिक व सांस्कृतिक प्रथा. पुणे: महाराष्ट्र ऐतिहासिक संस्था. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग. (2018). महाराष्ट्रातील किल्ले आणि वाड्यांचे सर्वेक्षण अहवाल. नवी दिल्ली: भारत सरकार. देशपांडे, क. (2003). मराठा वाड्यांतील लाकडी नक्षीकाम व शिल्पकला. पुणे: मराठा कला व संस्कृती अकादमी. कुलकर्णी, प., & शिंदे, र. (2017). अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण. अहमदनगर: राज्य पुरातत्त्व विभाग. महाराष्ट्र राज्य घोषणापत्र. (1976). अहमदनगर जिल्हा: ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पाचा आढावा. मुंबई: महाराष्ट्र सरकार. चव्हाण, द. (2011). मराठा इतिहासातील किल्ले आणि वाड्यांचे सांस्कृतिक महत्त्व. पुणे: मराठा संशोधन प्रकाशन. राजे, स. (2009). मराठा सैन्य वास्तुकला आणि संरक्षण संरचना. पुणे: सह्याद्री अकादमी. महाराष्ट्र ऐतिहासिक संस्था. (2014). पारनेर तालुक्याचे ऐतिहासिक नोंदी संकलन. पुणे: HSM प्रकाशन.

Published

20-12-2025

How to Cite

गिरमकर डॉ. के. एल., and बेलोटे मच्छिंद्र नाथा , trans. 2025. “मराठा साम्राज्याच्या काळातील पारनेर तालुका: वाडे व गढींचा अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 616-23. https://iipublications.com/iipimrj/article/view/784.

Share

Similar Articles

31-40 of 103

You may also start an advanced similarity search for this article.