औपनिवेशिक काळातील सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विकास: एक चिकित्सक अभ्यास
Keywords:
वसाहतवाद, राष्ट्रवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद, एकोणीसावे शतक, औपनिवेशिक भारत, इतिहासलेखन, राष्ट्रीय ओळख, स्वातंत्र्य चळवळAbstract
औपनिवेशिक काळात भारतात उदयास आलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा केवळ राजकीय स्वातंत्र्याच्या मागणीपुरता मर्यादित नव्हता, तर तो वसाहतवादी सत्तेच्या बौद्धिक व सांस्कृतिक वर्चस्वाविरोधातील व्यापक प्रतिक्रिया होता. ब्रिटिश इतिहासलेखन व प्रशासकीय विचारसरणीने भारतीय समाजाला मागास, अंधश्रद्धाळू व इतिहासविरहित ठरविण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर भारतीय बुद्धिजीवींनी आपल्या इतिहास, परंपरा, भाषा, धर्म व सांस्कृतिक स्मृती यांचे पुनर्वाचन करून राष्ट्रीय ओळखीची नव्याने मांडणी केली. या संशोधन लेखात औपनिवेशिक काळातील सांस्कृतिक राष्ट्रवादाची संकल्पना, त्याचा ऐतिहासिक विकास, विविध प्रादेशिक प्रवाह आणि स्वातंत्र्य चळवळीवरील प्रभाव यांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. बंगाल पुनर्जागरण आणि महाराष्ट्रातील परंपरांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकांचा राष्ट्रभावना जागविण्यासाठी झालेला वापर आणि त्यातून निर्माण झालेल्या मर्यादांचाही विचार केला आहे. हा अभ्यास असे दर्शवितो की सांस्कृतिक राष्ट्रवादाने भारतीय समाजात आत्मसन्मान व राष्ट्रीय चेतना निर्माण केली; मात्र त्याच वेळी त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या वर्चस्ववादी व बहिष्कृत प्रवृत्त्यांमुळे सामाजिक तणावही निर्माण झाले. म्हणूनच समकालीन संदर्भात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
Downloads
References
Anderson, Benedict. Imagined Communities. Verso, 1983. Thapar, Romila. The Past Before Us. Harvard UP, 2013. Chandra, Bipan. Nationalism and Colonialism in Modern India. Orient Blackswan, 2010. Deshpande, Prachi. Creative Pasts: Historical Memory and Identity in Western India. Columbia UP, 2007. Sen, S. P. Historians and Historiography in Modern India. Institute of Historical Studies, 1973. Jaffrelot, Christophe. The Hindu Nationalist Movement in India. Columbia UP, 1996. सावरकर, विनायक दामोदर. हिंदुत्व : हिंदू कोण आहे? नागपूर, १९२३. पांडे, ग्यानेंद्र. औपनिवेशिक भारतातील राष्ट्रवाद. पर्मानंट ब्लॅक, २०१०.