आधुनिक भारताच्या विकासामधील राजा राममोहन रॉय यांचे सामाजिक कार्य आणि योगदान

Authors

  • प्रा. मंगेश माधव देवडे Author

Keywords:

आधुनिक भारत राजा राममोहन रॉय

Abstract

राजा राममोहन रॉय यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळीची सुरुवात केली. भारतामध्ये ब्रिटीशांच्या सत्तास्थापनेनंतर अनेक सुधारकांनी विविध क्षेत्रात कार्ये केली असली तरी रॉय यांचे कार्य आकाशात असणा-या सूर्याइतकेच प्रकाशमान असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम ब्रिटीशांनी बंगाल प्रांत जिंकला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजा राममोहन रॉय यांनी भारतात नवजागरणाची सुरुवात केली. रॉय यांनी पाश्चात्य संस्कृती आणि बारतीय संस्कृती अशा दोनही संस्कृतीचा सखोल अभ्यास केला होता. संस्कृत, फारशी, अरबी, ग्रीक, हिब्रू, लॅटीन, इंग्लिश आणि फ्रेंच या भाषा ते शिकले होते. इ.स. १८१७ मध्ये त्यांनी स्वतः कलकत्ता येथे इंश्लिश स्कूल स्थापन केले होते. रॉय यांनी प्रस्थापित हिंदू धर्मावर टीका केली असली तरी त्यांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता. एकेश्वरवाद, नीती, विश्वधर्म, बंधुता, सद्सद्विवेक हे त्यांच्या धर्मविचारांचे विशेष होते. रॉय यांनी जातीव्यवस्थेस विरोध केला. सामाजिक क्षेत्रात रॉय यांनी स्त्रियांची परिस्थिती कशी सुधारेल यावर भर दिल्याचे दिसून येते. विधवा स्त्रियांची वाईट अवस्था आणि स्त्रियांना मालमत्तेचा हक्क व वारसा हक्क मिळण्यासाठी ते आग्रही होते. सनातन्यांच्या विरोधात जाऊन सतीविरोधी प्रथेस विरोध करण्याचे धाडस त्यांनी केले. सतीविरोधी कायदा होण्यास रॉय यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले परिणामी सनातन्यांच्या रोषासही त्यांना तोंड द्यावे लागले. जगातील घडामोडींकडे तसेच युरोपातील उदारमतवादी चळवळीकडे त्यांचे लक्ष होते. जगातील राष्ट्रांच्या परस्पर सहकार्याचा त्यांनी पुरस्कार केला, ते आंतरराष्ट्रीय होते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. मंगेश माधव देवडे

    (इतिहास विभाग) रा. ब. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर ता.श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर.

Published

20-12-2025

How to Cite

देवडे प्रा. मंगेश माधव , trans. 2025. “आधुनिक भारताच्या विकासामधील राजा राममोहन रॉय यांचे सामाजिक कार्य आणि योगदान”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 691-93. https://iipublications.com/iipimrj/article/view/800.

Share

Similar Articles

31-40 of 103

You may also start an advanced similarity search for this article.