महाराष्ट्रातील स्वातंत्र्ययुद्धातील आदिवासी चळवळ

Authors

  • प्रा. अतुल रामदास पोखरकर Author

Keywords:

महाराष्ट्र आदिवासी चळवळ

Abstract

आदिवासी म्हणजे या देशातील मूळ निवासी जे आधी पासून येथील जनजाती असून ती जंगलात वास करते त्यामुळे यांना मूलनिवासी अथवा आदिवासी असे संबोधले जाते. काळानुरूप अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी आदिवासी समाजाची व्याख्या केली आहे. परंतु आदिम जमात असे याचे मूळ रूप आहे. प्राचीन काळापासून हा समाज शिक्षणापासून वंचित व मूळ प्रवाह पासून विलग असल्यामुळे त्यांच्या कार्याला किंवा कृतीला लेखनप्रवाहामध्ये मिसळू दिले नाही. तसेच त्यांना इतिहासच नाही अशी धारणा होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात समाजातील अनेक घटकांचा उल्लेख केला आहे. परंतु आदिवासी समाजाच्या लढ्याला बंड असा उल्लेखून त्यांचे कार्य सीमित करण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी व इतिहासकारांनी केला. आदिवासी समाजाने येथील सावकारशाही व ब्रिटीशशासनाविरुद्ध उभारलेल्या सशस्त्र क्रांतिकारी उठावाला कवडी मोल ठरविण्यात इतिहासकार व अभ्यासक चुकले नाही. सुरुवातीपासूनच आदिवासी समाजाला डावलून त्यांना मूळप्रवाहापासून अलिप्त ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान अभ्यासणे आवश्यक आहे. १८१८ मध्ये मराठ्यांच्या हातून इंग्रजांनी सत्ता मिळवून महाराष्ट्रात प्रशासक म्हणून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी काम पाहू लागली. त्यांनी कायदे सुव्यवस्था निर्माण केली. यामध्ये जंगल कायदे, फौजदारी कायदे, गुन्हेगार जमात कायदा इत्यादी कायद्यांचा उल्लेख येतो. याचा परिणाम येथील सर्वसामान्य वर्गाप्रमाणेच येथील आदिवासी समाजावर झाला. त्यांनी याविरुद्ध बंड केले. अनेक आदिवासी क्रांतिकारक हुतात्मा झाले. परंतु आज ही त्याच्या कार्याची दखल घेतली जात नाही. त्यांचा इतिहास लिखित स्वरुपात नसून तो स्थानिक लोकांनी जात्यावरील ओव्या, पोवाडे, भलरी, गीते व कथा यांच्या माध्यमातून त्यांनी जिवंत ठेवले आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. अतुल रामदास पोखरकर

    महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल

References

गोविंद गारे (२०२४), महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, मिहाना पब्लिकेशन, पुणे, पृ. ११. Gazetteer of Bombay presidency (1880), khandesh volume 12, p. 54 Grierson G.A (1909), Linguistic Survey of India, Volume 9, Part 3, Calcutta, p 1. देशमुख, वि. ब. (१९७२), कोळी उठाव, राजहंस प्रकाशन, पुणे, पृ. ४१. कुलकर्णी, अ. रा. (२००४), ब्रिटिश काळातील महाराष्ट्र, राजहंस प्रकाशन, पुणे, पृ ११९. पाटील, स. न.(१९८०), उमाजी नाईक आणि रामोशी उठाव, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृ. ६३. डॉ. जाधव, स. र.(२००१), आदिवासी उठाव आणि ब्रिटिश राजवट, नालंदा प्रकाशन, औरंगाबाद, पृ. १०२. https://indiejournal.in/article/historic-warli-revolt-turns-seventy-today-writes-shridhar-pawar Date: 18 Jan 2026. Gazetteer of the Bombay presidency (1884), Ahemadnagar, volume 1, p. 300. Wilson John (1876), Aboriginal Tribe of the Bombay, Government Central Press, Bombay, p 20-21. विलास दुंदा गोवारी (२०२३), वसाहतिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव, हरिती पब्लिकेशन, पृ. ४४.

Published

20-12-2025

How to Cite

पोखरकर प्रा. अतुल रामदास , trans. 2025. “महाराष्ट्रातील स्वातंत्र्ययुद्धातील आदिवासी चळवळ”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 782-86. https://iipublications.com/iipimrj/article/view/819.

Share

Similar Articles

11-20 of 103

You may also start an advanced similarity search for this article.