गणितातील भारतीय ज्ञानप्रणाली संदर्भात डी.एल.एड. छात्राध्यापिकांची धारणा: एक अभ्यास
Keywords:
भारतीय ज्ञान परंपरा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अभ्यासक्रम समाकलनAbstract
सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मध्ये भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) च्या समावेशावर भर दिला जात आहे. त्यामुळे, भावी शिक्षक म्हणून डी.एल.एड. छात्राध्यापिकांची गणितातील IKS बद्दलची धारणा तपासणे महत्त्वाचे ठरते. या संशोधनाचा उद्देश त्यांची जागरूकता, सकारात्मकता आणि अंमलबजावणीतील संभाव्य आव्हाने समजून घेणे हा होता. सर्वेक्षण पद्धती वापरून तयार केलेल्या प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा करण्यात आली आणि तिचे टक्केवारी व सरासरीद्वारे विश्लेषण करण्यात आले. निष्कर्षांवरून असे दिसून आले की छात्राध्यापिकांमध्ये मूलभूत IKS संकल्पनांबद्दल (उदा. शून्य, दशमान पद्धती) उच्च जागरूकता आहे आणि IKS चा समावेश अभ्यासक्रमात करण्याबद्दल सकारात्मक धारणा आहे. तथापि, अध्यापनासाठी साहित्य/प्रशिक्षणाचा अभाव हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. हे निष्कर्ष डी.एल.एड. अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेसाठी आणि शिक्षक प्रशिक्षण सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.