सामाजिक शास्त्र संशोधनातील नमुना निवड पद्धती

Authors

  • Mrs. Sarika B. Patil Author

Keywords:

सामाजिक शास्त्र, संशोधन, नमुना निवड पद्धती

Abstract

गृहिणी भात शिजला की नाही हे बघण्याकरिता एक दोन शित घेऊन त्यावरून निर्णय घेतात की, भात शिजला की नाही. त्यावरूनच 'शितावरून भाताची परीक्षा' अशी म्हण प्रचलित झाली आहे. भाताचे शित म्हणजे संपूर्ण भांड्यातील भाताचा नमुना होय. कारण भांड्यातील संपूर्ण भाताचे प्रतिनीधित्व भाताचे शित करीत असते. अशा प्रकारे दैनंदिन जीवनात नेहमीच नमुन्याचा उपयोग केला जातो. त्या नमुन्यावरून त्या वस्तुविषयीचा अनुमान किंवा अंदाज काढला जातो. संशोधनात नेहमीच नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला जातो. संशोधन कार्य हे जनगणना आणि नमुना निवड या दोन पद्धतीच्या आधारावर केले जाते. जनगणना पद्धतीमध्ये आपल्या अध्ययन विषयाशी संबंधित असणाऱ्या संपूर्ण एककांचे अध्ययन करूनच निष्कर्ष काढावे लागतात. परंतु मानवी जीवन हे गतिशील आणि परिवर्तनशील असल्यामुळे कोणतेही संशोधन कार्य हे फार मोठ्या कालावधी पर्यंत सुरू राहिल्यास त्या संशोधन विषयाच्या समग्रातील एककात परिवर्तन होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर जनगणना पद्धत वेळ, श्रम आणि पैशाच्या दृष्टीने ही परवडणारी नसते. म्हणून नेहमीच जनगणना पद्धतीचा अवलंब करणे संशोधनकर्त्याला शक्य नसते. तसेच जनगणना पद्धत आणि नमुना पद्धत यांच्या अध्ययनातील निष्कर्षामध्ये फारसा फरक नसतो. त्यामुळे सामाजिक शास्रामध्ये संशोधक नमुना निवड पद्धतीचा उपयोग करतात.

प्रस्तुत लेखन हे सामाजिक शास्रातील संशोधन पद्धती यामधील नमुना निवडीचे तंत्र या विषयाच्या अनुषंगाने केलेले आहे. यामध्ये सामाजिक संशोधनात नमुन्याची आवश्यकता, नमुना निवडीच्या संभाव्य व गैर-संभाव्य पद्धती त्यांचे विविध प्रकार तसेच नमुना निवडीच्या विविध प्रकारांचेही उप-प्रकार यांचा संक्षीप्त आढावा घेतलेला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • Mrs. Sarika B. Patil

    Assistant Professor

    Yashwantrao Chavan Open University,

    Solapur Center

References

१. आगलावे प्रदीप,(२०१५), ‘सामाजिक संशोधन पद्धती व तंत्रे’, श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर.

२. बोधनकर सुधीर, अलोणी आणि कुलकर्णी (२०११), ‘सामाजिक संशोधन पद्धती’, श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर

३. Kothari C. R., (2004), ‘Research Methodology Methods & Techniques’, New Age International Publishers, New Delhi.

Downloads

Published

26-12-2024

How to Cite

Patil, Mrs. Sarika B. , trans. 2024. “सामाजिक शास्त्र संशोधनातील नमुना निवड पद्धती”. IIP : International Multidisciplinary Research Journal 1 (Issue - IV (Oct-Dec): 6. https://iipublications.com/iipimrj/article/view/2.

Share

Similar Articles

41-45 of 45

You may also start an advanced similarity search for this article.