स्वदेशी चळवळ : एक चिकित्सक अभ्यास

Authors

  • सोमनाथ रमेश गायकवाड Author
  • सोहम सतीश पावशे Author

Keywords:

स्वदेशी चळवळ, बंगालची फाळणी, चतुःसूत्री, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य आत्मनिर्भर भारत

Abstract

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील १९०५ ची स्वदेशी चळवळ ही एक अत्यंत गौरवशाली आणि निर्णायक घटना मानली जाते. ब्रिटीश साम्राज्यवाद हा केवळ राजकीय नसून तो आर्थिक शोषणावर आधारित आहे, हे ओळखून भारतीय नेत्यांनी सुरू केलेले हे पहिले मोठे जनआंदोलन होते. प्रस्तुत शोधनिबंधात स्वदेशी चळवळीची पार्श्वभूमी, लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी आणि त्याविरुद्ध उमटलेल्या प्रतिक्रियेचा अभ्यास करण्यात आला आहे. लोकमान्य टिळकांनी मांडलेली स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ही ‘चतुःसूत्री’ या चळवळीचा मुख्य आधार होती. या संशोधनाद्वारे चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग, स्त्रियांचे योगदान आणि भारतीय उद्योगांच्या विकासाचे विश्लेषण ऐतिहासिक व विश्लेषणात्मक पद्धतीने मांडले आहे. अखेरीस, ही चळवळ केवळ वस्तूंपुरती मर्यादित नसून ती आत्मसन्मानाची चळवळ होती आणि तिनेच पुढील गांधीवादी आंदोलनांना बाळकडू दिले, हे या शोधनिबंधातून स्पष्ट होते.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • सोमनाथ रमेश गायकवाड

    एम.ए इतिहास भाग II, रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर

  • सोहम सतीश पावशे

    सहाय्यक प्राध्यापक, रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर

Published

20-12-2025

How to Cite

गायकवाड सोमनाथ रमेश, and पावशे सोहम सतीश , trans. 2025. “स्वदेशी चळवळ : एक चिकित्सक अभ्यास”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 716-19. https://iipublications.com/iipimrj/article/view/806.

Share

Similar Articles

11-20 of 104

You may also start an advanced similarity search for this article.