ब्रिटिशकालीन शैक्षणिक सुधारणा

Authors

  • गोरख गोविंद गोमासे Author

Keywords:

ब्रिटिश

Abstract

ब्रिटिश राजवटीच्या काळातील शिक्षण धोरण हे भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांमध्ये निर्णायक ठरलेले एक साधन होते भारतात शिक्षण पद्धतीचा विकास करून, ब्रिटिशांनी भारतीय समाजात एक नवीन प्रकारचा प्रभाव निर्माण केला. 1813 च्या चार्टर act सुरू झालेला हा प्रवास 1835 व्या मॅकॉलेच्या मिनिट्स आणि 1854 च्या वुड्स डिस्पॅचपासून अधिक ठोस आणि विस्तृत धोरणाच्या रूपात समोर आला. ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणामध्ये इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व वाढवणे, पाश्चात्य विचारसरणीचा प्रसार करणे, आणि भारतीयांच्या मनावर प्रशासनाच्या आदर्शाचा ठसा उमटवणे हे मुख्य उद्दिष्ट होते. ब्रिटिशांच्या या धोरणाने पारंपारिक भारतीय शिक्षण पद्धती, स्थानिक ज्ञान, आणि धर्म व संस्कृतीवरील शिक्षणाच्या संकल्पनांना बाजूला सारले. त्याऐवजी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार केला गेला, ज्याचा उद्देश ब्रिटिशांसाठी एका स्थिर आणि व्यवस्थापन-क्षम भारतीय कर्मचारी वर्गाची निर्मिती करणे हा होता. यातून पाश्चात्य वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि आधुनिक शिक्षणाची मूल्ये भारतीय समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. तथापि, हे शिक्षण भारतीय समाजाच्या पारंपरिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांना आव्हान देणारे ठरले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • गोरख गोविंद गोमासे

Published

20-12-2025

How to Cite

गोमासे गोरख गोविंद , trans. 2025. “ब्रिटिशकालीन शैक्षणिक सुधारणा”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 725-30. https://iipublications.com/iipimrj/article/view/808.

Share

Similar Articles

1-10 of 103

You may also start an advanced similarity search for this article.