पर्यावरणीय जाणीव व शाश्वत विकासासाठी ग्रंथालयाची भूमिका : पुस्तकापासून पर्यावरणापर्यंत
Keywords:
शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन, हरित ग्रंथालयAbstract
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास हे मानवी अस्तित्वाशी निगडीत आहेत. ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवणारी संस्था म्हणून ग्रंथालये या परिवर्तन प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावत आहेत. ग्रंथालय केवळ ज्ञानकोश न राहता समाजपरिवर्तनाचे, पर्यावरण जागृतीचे आणि शाश्वत विकासाचे प्रभावी माध्यम आहे. ‘हरित ग्रंथालय’ ही संकल्पना पर्यावरणपूरक रचना, उर्जेची बचत, डिजिटल संसाधनांचा वापर, आणि पर्यावरण विषयक जनजागृती यावर आधारित असून मानवी व पर्यावरणीय मूल्यांना जोडणारी आहे तर शाश्वत विकास Sustainable Development ही संकल्पना आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समतोल राखत पुढे जाण्याची प्रक्रिया आहे. आजच्या माहितीप्रधान समाजात ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांची भूमिका केवळ ज्ञान वितरणापुरती मर्यादित नसून पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागृती आणि जबाबदार नागरिकत्व निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या लेखाद्वारे शाश्वत विकासाच्या दिशेने ग्रंथालयांचे योगदान, तसेच ग्रंथपालाची भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
Downloads
References
Biswas, A. (2021). Role of Green Information Communication Technology to Transform Library as Green Library: a Study in The Context of Academic Library. Influences of Green Technology in Academic Libraries, March, 195–214. https://www.researchgate.net/publication/350018416_Role_of_Green_Information_Communication_Technology_to_Transform_Library_as_Green_Library_A_Study_in_the_Context_of_Academic_Library Das, R. K. (2023). The Green Blueprint : Strategies For Building And Operating Sustainable Academic Libraries With Special References To The University Libraries Of Assam. December. https://doi.org/10.1729/Journal.37179 https://www.ifla.org/the-ifla-guidelines-for-green-and-sustainable-libraries/ Lal, J. (2018). The Green Library: An Initiative to Sustainable Library. Pearl : A Journal of Library and Information Science, 12(1), 28. https://doi.org/10.5958/0975-6922.2018.00004.9 Pagore Ranjeet , Chalukya,B.V.(2022). Green Library. IP Indian Journal of Library Science and Information Technology. 7(1):36-39, 2022. | https://doi.org/10.18231/j.ijlsit.2022.007