विज्ञान विषयातील घटकासाठी पंचकोशाधारित पाठ टाचण निर्मिती
##semicolon##
पाठ टाचण##common.commaListSeparator## विज्ञानसार
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल होत आहे. NEP 2020 मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच अनुभवाधारित आणि आनंदमय शिक्षणावरती दिलेला भर पाहता भारतीय तत्त्वज्ञानाचे पंचकोशीय पाठ टाचण यासाठी एक प्रभावी चौकट प्रदान करते. परंतु पंचकोशानुसार पाठ टाचण व अध्यापन तसेच शाळेमध्ये याची व्यवहार्य अंमलबजावणी व तिचे परिणाम यावर फारच कमी संशोधन आहे. त्यामुळे पंचकोशानुसार पाठ टाचण तयार केल्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक ,मानसिक, बौद्धिक व भावनिक क्षमतांचा विकास होतो का? याबद्दल वैज्ञानिक पुराव्यावर आधारित अभ्यासाची आवश्यकता आहे .शिक्षकांसाठी पंचकोशीय पाठ टाचण NEP 2020 च्या आधारे अध्यापनात नाविन्य आणण्यासाठी उपयुक्त साधन आहे. या संशोधनाचा उद्देश पंचकोशाधारित पाठ टाचण तयार करणे, त्याचा प्रत्यक्ष वर्गात वापर करून निरीक्षण करणे व चर्चा घडवणे हा आहे.