अंतोनिओ ग्राम्शीचे जीवन आणि त्याची वैचारिकता : ऐतिहासिक मूल्यमापन
##semicolon##
हेजिमनी##common.commaListSeparator## मार्क्सवाद##common.commaListSeparator## धुरीणत्त्व##common.commaListSeparator## प्रिन्स##article.abstract##
अंतोनिओ ग्राम्शी (१८९१-१९३७) विसाव्या शतकातील महत्त्वाचा मार्क्सवादी विचारवंत होता. अल्प आयुष्य लाभलेल्या ग्राम्शीला आयुष्यभर प्रकृतीच्या तक्रारी राहिल्यात, त्याला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, आर्थिक विवंचनेमुळे त्याचे पोषण भरण योग्य पद्धतीने झाले नाही. त्याच्या मोठा भावाचा कल समाजवादाकडे असल्याने त्याचा परिणाम ग्राम्शीवर झाला. तुरीन विद्यापीठातील काळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कलाटणी देणारा ठरला. त्याने आपले शिक्षण पूर्ण न करता सक्रीय राजकारणात भाग घेतला. रशियातील साम्यवादी क्रांतीने प्रभावित झालेल्या ग्राम्शीने इटालियन कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करून इटलीत क्रांतीचे स्वप्न बघितले परंतु मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही, आपल्या आयुष्याचा बराच काळ त्याला तुरुंगात घालवावा लागला. ग्राम्शीने अकादमिक व राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्याने मांडलेली हेजिमनीची संकल्पना महत्त्वाची ठरली व त्याचा प्रभाव राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास आणि सांस्कृतिक अभ्यासावर झाला.
##plugins.themes.default.displayStats.downloads##
##submission.citations##
1. Clark, M. (1977). Antonio Gramsci and the Revolution That Failed. Yale University Press.
2. Fiori, G. (1970). Antonio Gramsci: Life of a Revolutionary. New Left Books.
3. Forgacs, D. (2000). The Gramsci Reader: Selected Writings 1916–1935. NYU Press.
4. Gramsci, A. (1971). Selections from the Prison Notebooks. Edited & translated by Quintin Hoare & Geoffrey Nowell Smith. New York: International Publishers.
5. Hoare, Q., & Smith, G. N. (1971). Selections from the Prison Notebooks of Antonio Gramsci. Lawrence & Wishart.
6. ग्राम्शी, अन्तोनियो. (२०२०). साहित्य, संस्कृति और विचारधारा. अनुवाद और सम्पादन रामनिहाल गुंजन. गार्गी प्रकाशन.