स्वातंत्र्योत्तर काळातील विज्ञान व तंत्रज्ञान विषयक धोरणे आणि लोकशाही समाजाची निर्मिती
##semicolon##
विज्ञान व तंत्रज्ञान##article.abstract##
आधुनिक लोकशाही समाजांची निर्मिती ही केवळ राजकीय संस्था आणि घटनात्मक चौकटीपुरती मर्यादित नसून, ती सामाजिक विकास, सार्वजनिक कल्याण आणि विवेकाधिष्ठित संस्कृतीवर आधारित असते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात विज्ञान व तंत्रज्ञान धोरणांनी या लोकशाही समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रस्तुत संशोधन लेखात भारत सरकारच्या Scientific Policy Resolution (१९५८) आणि Technology Policy Statement (१९८३) या दोन मूलभूत धोरणांचा लोकशाही समाजांच्या विकासाशी असलेला ऐतिहासिक संबंध अभ्यासला आहे. विशेषतः १९५८ च्या विज्ञान धोरणाच्या निर्मितीमागील वसाहतवादी वारसा, राष्ट्रीय चळवळीतील वैज्ञानिक विचार, आणि स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या गरजा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. या लेखाचा मुख्य युक्तिवाद असा आहे की विज्ञान व तंत्रज्ञान धोरणे ही केवळ तांत्रिक दस्तऐवज नसून, ती लोकशाही मूल्ये जसे की समान संधी, सार्वजनिक विवेक, आणि सामाजिक समावेशन यांची पायाभरणी करणारी साधने ठरली आहेत. त्यामुळे विज्ञान धोरणांचा इतिहास हा भारतीय लोकशाहीच्या सामाजिक अधिष्ठानाचा अविभाज्य भाग मानला पाहिजे.