अध्ययन- अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर
##semicolon##
अध्ययन- अध्यापन##common.commaListSeparator## माहिती व संप्रेषण##article.abstract##
आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वेगाने झालेल्या प्रगतीमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या बदलांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) ही एक क्रांतिकारक संकल्पना ठरत आहे. मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे विचार करणे, निर्णय घेणे, समस्या सोडवणे आणि शिकणे ही क्षमता संगणक प्रणालीमध्ये विकसित करणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. परंपरागत अध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षक केंद्रस्थानी असत, तर सर्व विद्यार्थ्यांना समान गतीने व समान पद्धतीने शिकवले जात असे. मात्र प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो त्याची बुद्धिमत्ता, आवड, शिकण्याची गती व क्षमता भिन्न असते. अशा परिस्थितीत अध्ययन-अध्यापन अधिक वैयक्तिक, प्रभावी व विद्यार्थी-केंद्रित बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने स्मार्ट क्लासरूम, ऑनलाईन शिक्षण मंच, अॅडॅप्टिव्ह लर्निंग सिस्टीम, इंटेलिजंट ट्यूटरिंग सिस्टीम, चॅटबॉट्स, ऑटोमॅटिक मूल्यमापन प्रणाली यांसारख्या आधुनिक साधनांचा विकास झाला आहे. या साधनांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अध्ययन सामग्री मिळते, त्वरित अभिप्राय प्राप्त होतो आणि शिकण्यातील अडचणी लगेच ओळखता येतात. शिक्षकांसाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते. अभ्यासक्रम नियोजन, अध्यापन साहित्य निर्मिती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण, मूल्यमापन व प्रशासनिक कामांमध्ये AI मुळे वेळ व श्रम वाचतात. त्यामुळे शिक्षक अधिक सर्जनशील व मार्गदर्शकाची भूमिका प्रभावीपणे पार पाडू शकतात.