महाराष्ट्रातील खंडकरी शेतकऱ्यांचा यशस्वी लढा : एक ऐतिहासिक आढावा

Authors

  • प्रा. डॉ. गाढवे किशोर गुलाब Author

Keywords:

आधुनिक महाराष्ट्र खंडकरी

Abstract

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण ही अनेक राजकीय व सामाजिक चळवळी मधून झालेली आहे. प्रचलित व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी अनेकजण एकत्र येऊन एका विचाराने सामुहिक कृतीशील लढा उभारतात त्याला सामाजिक चळवळ असा आशय प्राप्त होतो.याच कृतीशील विचारातून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खाजगी उद्योगपतींच्या विरोधात संघटीत होऊन १९५२ ते २०१२ असा ६० वर्ष अहिंसेच्या मार्गाने खंडकरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा दिला. खंडकरी शेतकऱ्यांनी खंडाने दिलेल्या जमिनी कराराचा कालावधी संपल्यानंतर रीतसर कसण्यासाठी परत मिळाव्यात या सनदशीर मागणीचा लढा ६० वर्ष लढविला आणि यश मिळविले. देशातील सर्वात दीर्घकाळ चाललेला ऐतिहासिक लढा म्हणून याची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात खाजगी उद्योगपती, कारखानदार यांच्या बरोबरच सरकारनेही वेळोवेळी उठवलेला दिसतो. पश्चिम महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली ब्रिटीश सरकारकडून खाजगी कारखानदारीला चालना देण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात उसापासून गुळ तयार केला जात होता. ब्रिटीश सरकारने ऊसापासून साखर तयार करण्यासाठी खाजगी कारखानदारीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. डॉ. गाढवे किशोर गुलाब

    यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड, ता.वाई.जि.सातारा.

Published

2025-12-20

How to Cite

महाराष्ट्रातील खंडकरी शेतकऱ्यांचा यशस्वी लढा : एक ऐतिहासिक आढावा. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 716-720. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1061

Similar Articles

1-10 of 230

You may also start an advanced similarity search for this article.