महार वतन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक ऐतिहासिक अभ्यास

Authors

  • डॉ. शरद तानाजी ठोकळे Author

Keywords:

भारतीय ग्रामीण समाजव्यवस्था, महार वतन

Abstract

भारतीय ग्रामीण समाजव्यवस्था ही परंपरागत वतनदारी पद्धतीवर आधारित होती. विविध जातींना विशिष्ट सेवा देण्याच्या बदल्यात वतन दिले जात असे. महार वतनाला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा इतिहास आहे. मराठा कालखंडात अतुलनीय पराक्रम केल्याबद्दल शौर्यशाली महारांना काही वतनी इनामी जमिनी देण्यात आल्या. सरकारच्या महत्त्वाच्या कामामध्ये त्यांचा उपयोग होत होता. मध्ययुगीन काळातील शेतशिवाराची माहिती ही फक्त महार वतनदारांनाच होती. त्यांनी शपथेवर दिलेली साक्ष गृहीत धरून न्याय निवाडा केला जात असे. न्यायदानाच्या कामामध्ये पाटील, कुलकर्णी यांना महार मदत करत. त्याकाळी महार लोकांचीच खरी साक्ष मानली जात होती. महार हे प्रामाणिक लोक समजले जात. मध्ययुगीन काळामध्ये प्रत्येक वतनदारांचे कार्यक्षेत्र, हक्क, मानपान आणि कर्तव्य निश्चित करण्यात आली होती परंतु वतनदारांच्यामध्ये महार वतन असणाऱ्या लोकांच्या कामासंबंधीचे कोणतेच निश्चित स्वरूपाचे नियम नव्हते. त्यांना सरकारी, बिन सरकारी आणि खाजगी स्वरुपाची कामे बारा महिने करावी लागत होती त्यामुळे त्यांचे खूप हाल होत होते. महार वतन ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची पण अन्यायकारक व्यवस्था होती. या व्यवस्थेमुळे ग्रामीण प्रशासन सुरळीत चालत असले, तरी महार समाजावर सामाजिक, आर्थिक व मानसिक गुलामी लादली गेली. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये महार वतन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा अभ्यास करण्यात आला आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • डॉ. शरद तानाजी ठोकळे

    इतिहास विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

References

मून वसंत व इतर (संपा.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९०, पृ. ९०. अत्रे त्रिं. ना., गाव-गाडा, सरिता प्रकाशन, पाचवी आवृत्ती पुणे, २०१८, पृ. १६. कुलकर्णी अ. रा., शिवकालीन महाराष्ट्र, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१३, पृ. ४२-४६. वाघमारे केशव, ‘महार वतन’च्या लुटीला अभय? दैनिक लोकसत्ता, २०२५ पृ. ७. कांबळे बळीराम, महारवतनी इनामी जमिनीचा प्रश्न, सुगावा प्रकाशन, पुणे, २००५, पृ. १८. खैरमोडे चां. भ., भीमराव रामजी आंबेडकर चरित्र-खंड २., समता शिक्षण संस्था, पुणे, २०२२, पृ. २४८-२४९. आंबेडकर बी. आर., महार आणि त्यांचे वतन, नाग-नालंदा प्रकाशन, चौथी आवृत्ती सांगली, २०१३, पृ. ५३-५४. सिंगारे अनिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटिश संबंध, अरुण प्रकाशन, लातूर, २०१८, पृ. १३७. भंडारे एस. आर., मानवतेचे नवनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनिमय पब्लिकेशन, मुंबई, २०१४, पृ. ९२-९९. सिंह ब्रिजेश (संपा.) आपला आदर्श आपली प्रेरणा महामानव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१७, पृ. ७२.

Published

2025-12-20

How to Cite

महार वतन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक ऐतिहासिक अभ्यास. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2146-2151. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1117

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.