ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण व्यवस्था

Authors

  • प्रा.संगीता बोडखे Author
  • प्रा.डॉ.संजीव बोडखे Author

Keywords:

प्राचीन काळातील शिक्षण, ब्रिटिश सरकारने शिक्षण, समाजात आधुनिक विचार

Abstract

प्राचीन काळातील शिक्षण व्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील कोणत्या वर्गाने शिकावे व कोणत्या वर्गाने शिकवावे याचे स्वरूप ठरलेले होते. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्गातील मंडळी शिक्षण घेऊ शकत होती तर ब्राह्मण वर्गातील व्यक्ती शिकवू शकत होती. परंपरेने चालत आलेल्या शिक्षणात स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. इंग्रजांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांनी स्वतःची राज्यव्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली. त्यामुळे बहुजन समाजातील लोकांना शिक्षण मिळण्यास सुरूवात झाली. ब्रिटिश सरकारने शिक्षण प्रसारावर भर देवून महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या. सुरूवातीच्या काळात याकामी त्यांना ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मदत मिळाली. त्यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील तरूणांची नवी पिढी पाश्चात्य संस्कृतीच्या आणि आधुनिक विचारांच्या संपर्कात आली. ब्रिटिशांच्या भौतिक सुधारणांमुळे ज्ञानाची क्षितिजे रूंदावण्यास मदत झाली. त्यामुळे येथील समाजात आधुनिक विचाराचे वारे जोराने वाहू लागले.

Downloads

Download data is not yet available.

Author Biographies

  • प्रा.संगीता बोडखे

    इतिहास विभाग, प्रगती कला व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर

  • प्रा.डॉ.संजीव बोडखे

    इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा

Published

2025-12-20

How to Cite

ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण व्यवस्था. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2078-2081. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1104

Similar Articles

1-10 of 231

You may also start an advanced similarity search for this article.