भारतीय निवडणुकांवरील सामाजिक माध्यमांचा प्रभाव : निवडणुकांचे बदलते आयाम
Keywords:
भारतीय निवडणुक सामाजिकAbstract
इंटरनेट, स्मार्टफोन आणि इतर अनेक सामाजिक माध्यमांच्या वापरातील अमर्याद वाढीमुळे भारतीय लोकशाहीतील अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे निवडणूक प्रक्रिया मूलभूत स्वरूपात बदलली असल्याचे दिसते. फेसबुक, व्हॉट्सअॅप, एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या विविध व्यासपीठांमुळे राजकीय प्रचार, मतदारांशी संवाद, जनमतनिर्मिती आणि राजकीय सहभाग यांना नवे परिमाण प्राप्त झाल्याचे दिसते. २०१४ नंतर सामाजिक माध्यमे ही केवळ प्रचाराची पूरक साधने न राहता निवडणूकीच्या रणनीतीचे केंद्रबिंदू बनली आहेत. या संशोधन लेखात २०१४ पूर्वीचा आणि २०१४ नंतरचा कालखंड यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असून स्मार्टफोन वापर, तरुण मतदारांचा सहभाग, डिजिटल प्रचार तंत्र, खोटी माहिती (Fake News), दिशाभूल (Misinformation) आणि लोकशाही मूल्यांवरील त्याचा चांगला वाईट परिणाम यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. सामाजिक माध्यमांनी भारतीय निवडणुका अधिक सहभागी, वेगवान आणि प्रभावी बनवल्या असल्या तरी त्याचबरोबर लोकशाही प्रक्रियेस गंभीर आव्हानेही निर्माण केली आहेत. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा जबाबदार वापर, डिजिटल साक्षरता आणि प्रभावी नियमन अत्यावश्यक आहे.