आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महिला कबड्डी खेळाडूंचा प्रवास
##semicolon##
शारीरिक सुदृढता##common.commaListSeparator## क्रीडा विज्ञान##common.commaListSeparator## ताकद आणि सहनशक्तीसार
कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कशा पद्धतीने झाला याचा अभ्यास यामध्ये केलेला आहे.भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून खेळला जाणारा कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालेला आहे. A.K.F.I.,S.A.K.F व I.K.F या तीन संघटनांनी “Today is Asian game, Tomorrow is Olympic” हे ध्येय ठेवून या खेळाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. आज जवळ जवळ ३१ पेक्षा जास्त देशांमध्ये हा खेळ खेळला जातो व त्यांचे संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात. पुरुष व महिला अशा दोन्ही गटातील स्पर्धांचा समावेश अशियाई स्पर्धा, दक्षिण आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धा तसेच एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये या खेळांचा समावेश केला आहे. प्रो-कबड्डी मुळे तर या खेळाला एक ग्लॅमर स्वरूप प्राप्त झाले असून लवकरच हा खेळ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.