आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महिला कबड्डी खेळाडूंचा प्रवास
##semicolon##
शारीरिक सुदृढता##common.commaListSeparator## क्रीडा विज्ञान##common.commaListSeparator## ताकद आणि सहनशक्ती##article.abstract##
कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास कशा पद्धतीने झाला याचा अभ्यास यामध्ये केलेला आहे.भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून खेळला जाणारा कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालेला आहे. A.K.F.I.,S.A.K.F व I.K.F या तीन संघटनांनी “Today is Asian game, Tomorrow is Olympic” हे ध्येय ठेवून या खेळाचा प्रचार व प्रसार करीत आहेत. आज जवळ जवळ ३१ पेक्षा जास्त देशांमध्ये हा खेळ खेळला जातो व त्यांचे संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात. पुरुष व महिला अशा दोन्ही गटातील स्पर्धांचा समावेश अशियाई स्पर्धा, दक्षिण आशियाई स्पर्धा, वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धा तसेच एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये या खेळांचा समावेश केला आहे. प्रो-कबड्डी मुळे तर या खेळाला एक ग्लॅमर स्वरूप प्राप्त झाले असून लवकरच हा खेळ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.