महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीचा आर्थिक आणि सामाजिक चिकित्सक अभ्यास
##semicolon##
निवडणूक##common.commaListSeparator## महाराष्ट्र##common.commaListSeparator## अर्थव्यवस्था##common.commaListSeparator## समाज##common.commaListSeparator## लोकशाही##common.commaListSeparator## चिकित्सक अभ्याससार
लोकशाही व्यवस्थेचा कणा म्हणून निवडणुका ओळखल्या जातात. भारतातील महाराष्ट्र राज्य हे आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राज्य असल्यामुळे येथे होणाऱ्या निवडणुकांचे परिणाम केवळ राजकीय सत्तांतरापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते राज्याच्या अर्थव्यवस्थेवर व समाजरचनेवरही खोल परिणाम घडवून आणतात. या संशोधन पेपरचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीचा आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास करणे हा आहे. या अभ्यासात निवडणूक प्रक्रियेमुळे होणारा सार्वजनिक व खाजगी खर्च, स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, तसेच सामाजिक सहभाग, जातीय-धार्मिक समीकरणे व सामाजिक ध्रुवीकरण यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. दुय्यम माहितीच्या आधारे केलेल्या या अभ्यासातून असे आढळून येते की निवडणुका लोकशाही बळकट करतात; परंतु त्याच वेळी आर्थिक ताण, पैशाचा प्रभाव व सामाजिक तणावही वाढवतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, खर्च नियंत्रण व सामाजिक सलोखा जपणाऱ्या सुधारणा आवश्यक असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.