भारत–श्रीलंका राष्ट्रांच्या भौगोलिक संबंधांचा अभ्यास : एक भौगोलिक व भू‑राजनीतिक विश्लेषण

लेखक

  • श्री राहुल गंगाराम निपुंगे ##default.groups.name.author##
  • डॉ. शरद कर्णासाहेब औटी ##default.groups.name.author##
  • डॉ. शौकत झुंबरभाई फकीर ##default.groups.name.author##

##semicolon##

भारत##common.commaListSeparator## श्रीलंका##common.commaListSeparator## भौगोलिक संबंध##common.commaListSeparator## पाल्क सामुद्रधुनी##common.commaListSeparator## समुद्री सुरक्षा##common.commaListSeparator## भू-राजनीती

सार

भारत आणि श्रीलंका हे दक्षिण आशियातील दोन महत्त्वाचे शेजारी राष्ट्र असून भौगोलिकदृष्ट्या ते अतिशय जवळ आहेत. भारताच्या तमिळनाडू राज्याच्या दक्षिणेला स्थित असलेले श्रीलंका बेट बंगालच्या उपसागरा मध्ये (Palk Strait) पाल्क सामुद्रधुनीद्वारे भारतापासून विभक्त झाले आहे. या मर्यादित अंतरामुळे प्राचीन काळापासून दोन्ही राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि व्यापारी संपर्क प्रस्थापित झाले असून आधुनिक काळात हे संबंध आर्थिक, सामरिक आणि भू-राजनीतिक स्वरूप धारण करीत आहेत. प्रस्तुत संशोधन पेपरचा मुख्य उद्देश भारत–श्रीलंकेच्या भौगोलिक संबंधांचा सखोल अभ्यास करून भौगोलिक स्थानाचा उभय देशांचे राजनैतिक धोरण, व्यापार-वाणिज्य, समुद्री सुरक्षा, पर्यावरणीय संवर्धन तसेच तटवर्ती समुदायांच्या जीवनावर होणारा प्रभाव विश्लेषित करणे हा आहे. या अभ्यासामध्ये द्वितीयक माहितीच्या आधारे साहित्य समीक्षा, भौगोलिक रचना, समुद्री सीमारेषा करार, मासेमारीविषयक विवाद, हिंद महासागरातील सामरिक महत्त्व आणि परकीय शक्तींच्या उपस्थितीचा विचार करण्यात आला आहे. अभ्यासातून असे आढळते की भौगोलिक जवळीकता ही भारत–श्रीलंका सहकार्याची एक महत्त्वाची संधी ठरते; तथापि, याच जवळिकीमुळे समुद्री सीमा, मासेमारी हक्क, पर्यावरणीय प्रश्न आणि सामरिक स्पर्धा यांसारखी आव्हाने सुद्धा निर्माण होतात. त्यामुळे द्विपक्षीय संवाद, संयुक्त व्यवस्थापन व्यवस्था आणि परस्पर विश्वास निर्माण करणारी धोरणे राबविणे अत्यावश्यक आहे, परिणामतः असे म्हणता येईल की भौगोलिक घटक हे भारत–श्रीलंका संबंधांचे केंद्रबिंदू असून भविष्यातील स्थिर, शांततामय आणि सहकार्यपूर्ण संबंधांसाठी या घटकांचे संतुलित व दूरदृष्टीपूर्ण व्यवस्थापन करणे अपरिहार्य आहे.

##plugins.themes.default.displayStats.downloads##

##plugins.themes.default.displayStats.noStats##

##submission.authorBiographies##

  • श्री राहुल गंगाराम निपुंगे

    कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, ता . नेवासा, जी. अहिल्यानगर, ४१४१०५

  • डॉ. शरद कर्णासाहेब औटी

    कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, ता . नेवासा, जी. अहिल्यानगर, ४१४१०५

  • डॉ. शौकत झुंबरभाई फकीर

    कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई, ता . नेवासा, जी. अहिल्यानगर, ४१४१०५

प्रकाशित

2025-12-20

##submission.howToCite##

निपुंगे श्री राहुल गंगाराम, औटी डॉ. शरद कर्णासाहेब, and फकीर डॉ. शौकत झुंबरभाई , trans. 2025. “भारत–श्रीलंका राष्ट्रांच्या भौगोलिक संबंधांचा अभ्यास : एक भौगोलिक व भू‑राजनीतिक विश्लेषण”. IIP : International Multidisciplinary Research Journal 3 (Issue - I (January - March): 592-97. https://iipublications.com/iipimrj/article/view/778.

##plugins.generic.shariff.share##

##plugins.generic.recommendBySimilarity.heading##

##common.pagination##

##plugins.generic.recommendBySimilarity.advancedSearchIntro##