सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक परिवर्तनातील योगदान
##semicolon##
सावित्रीबाई फुले##common.commaListSeparator## सामाजिक परिवर्तन##common.commaListSeparator## स्त्रीशिक्षण##common.commaListSeparator## समता##common.commaListSeparator## दलित‑वंचित समाजसार
भारतीय समाजरचनेत एकोणिसाव्या शतकात खोलवर रुजलेल्या जातिभेद, स्त्रीदास्य, अज्ञान व अंधश्रद्धा या घटकांनी सामाजिक विषमता अधिक तीव्र केली होती. अशा परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, समता व मानवमूल्यांच्या आधारे सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. प्रस्तुत संशोधन पेपरचा उद्देश सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने सखोल अभ्यास करणे हा आहे. त्यांनी स्त्रीशिक्षणाची पायाभरणी केली, दलित‑वंचित घटकांसाठी शिक्षणाचे दार खुले केले, बालहत्या प्रतिबंध, विधवाविवाह समर्थन, स्त्रीपुरुष समतेचा आग्रह आणि पुरोगामी विचारसरणीचा प्रसार केला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात वैचारिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू ऐझाली. ऐतिहासिक व विश्लेषणात्मक पद्धतीने केलेल्या या अभ्यासातून सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रभावी नेतृत्वकर्त्या होत्या, हे त्यांच्या कार्यातून कीवर्ड्स: स्पष्ट होते.