भारतातील नाविन्यपूर्ण/अभिनव शैक्षणिक उपक्रम (Innovative Education Initiatives in India)
##semicolon##
नाविन्यपूर्ण शिक्षण##common.commaListSeparator## राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 डिजिटल शिक्षण##article.abstract##
भारतातील शिक्षण व्यवस्था अनेक दशकांपासून संरचनात्मक बदलांच्या प्रक्रियेत आहे. पारंपरिक शिक्षककेंद्रित शिक्षणापासून विद्यार्थी-केंद्रित, परिणामाधारित, अनुभवाधिष्ठित आणि तंत्रज्ञान-सहाय्यित शिक्षणाकडे संक्रमण हा या बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. 21व्या शतकातील कौशल्याधारित, तंत्रज्ञानाधारित व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाची गरज लक्षात घेऊन भारताने विविध स्तरांवर नाविन्यपूर्ण (Innovative) उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, डिजिटल इंडिया मिशन, DIKSHA, SWAYAM, अटल टिंकरिंग लॅब, परिणामाधारित शिक्षण (Outcome-based education), अनुभवाधिष्ठित शिक्षण (Experiential learning) इत्यादी उपक्रम शिक्षण क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडवून आणत आहेत. या संशोधनाचा उद्देश भारतातील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे अध्ययन करून त्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण, समावेशकता, तंत्रज्ञान वापर, कौशल्यविकास व शिक्षणक्षमता यांवर होणारा परिणाम विश्लेषित करणे हा आहे. संशोधनात साहित्याधारित अध्ययन (secondary data) तसेच धोरणांचे विश्लेषणात्मक स्वरूप वापरण्यात आले आहे. निष्कर्षांनुसार भारतात नाविन्यपूर्ण उपक्रमांची वाढ दिसून येते, परंतु समांतरपणे डिजिटल दरी, शिक्षक प्रशिक्षणाचा अभाव, निधी व अंमलबजावणीतील विसंगती यांसारख्या आव्हानांचाही समावेश आहे. शिक्षणातील नावीन्य टिकवण्यासाठी बहुधारकांचा सहभाग` (Participation of Multi-stakeholders), तंत्रज्ञान-सुलभता, धोरणात्मक समर्थन व संशोधनाधारित नियोजन गरजेचे आहे.