पर्यटनाचे भारताच्या आर्थिक विकासातील योगदान
Keywords:
विदेशी पर्यटकांचे आगमन, आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्नAbstract
भारत जगातील आठवी सर्वात मोठी पर्यटन अर्थव्यवस्था आहे. भारताची पर्यटन अर्थव्यवस्था 31 अब्ज डॉलर एवढी आहे. पर्यटन क्षेत्राचे भारताच्या एकूण रोजगारामध्ये 9.1 % व जीडीपीमधील योगदान अंदाजे 6.6% एवढे आहे. पायाभूत सोई-सुविधा, स्थानिक बाजारपेठा व लघु उद्योगांच्या विकासामध्ये पर्यटनाचे योगदान मह्त्वपूर्ण आहे. सन 2019 च्या तुलनेत सन 2020 साली व 2021 साली विविध देशातून भारतामध्ये आलेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्याचे प्रमुख कारण कोविड-19 हे आहे. फ्रान्समधून सर्वाधिक पर्यटक पर्यटनासाठी भारतामध्ये आले त्याखालोखाल इटली देशातून सर्वाधिक पर्यटक पर्यटनासाठी भारत देशामध्ये आले. दिल्ली याठिकाणी 39.70%, मुंबई याठिकाणी 13.90%, चेन्नई याठिकाणी 7.90% पर्यटक भारतामध्ये आलेले दिसून येतात. सन 2019 मध्ये 30.06 अब्ज डॉलर व सन 2020 मध्ये 6.96 अब्ज डॉलर एवढे उत्पन्न विदेशी पर्यटकांच्या आगमनामुळे भारतास प्राप्त झाले. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये कोविड-19 च्या प्रभावामुळे विदेशी पर्यटकांच्या आगमनापासून भारतात प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामध्ये -76.8% नी घट झालेली दिसून येते.