बदलतं शिक्षण आणि ज्ञानरचनावाद
Keywords:
शिक्षण ज्ञानरचनावादAbstract
शिक्षण कशासाठी, असा प्रश्न जर मनात डोकावला तर त्याचे सोपे उत्तर आहे जीवनासाठी. भविष्यकाळ सुकर करण्यासाठी लागणाऱ्या क्षमता जर शिक्षण पुरे करू शकत नसेल तर शिक्षण व्यर्थ आहे. जीवनाशी जोडणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मुलामध्ये उपजत शिकण्याची आवड असते. जर शाळांनी ती जोपासली तर मुले सरसर शिकतात. आनंदाने नव्या गोष्टी आत्मसात करतात. काळानुरूप शिक्षण पद्धतीत क्रांती झालेली आहे. वर्तनवादातून रचनावादाकडे शिक्षणाची वाटचाल जोरात सुरू आहेच. नव्या धोरणांतर्गत शिक्षणात महत्त्वाचे बदल झालेले आहेत. शिक्षणाचे उद्दिष्ट बदललेले आहे. शिक्षणाचा आशयदेखील बदलला आहे आणि यामुळे अर्थातच अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन नक्कीच बदललेले आहे. म्हणून शिक्षकाची भूमिका व मानसिकता जुनी राहून चालणार नाही. शिक्षण दोन माध्यमांतून होत असते. एक शाळा तर दुसरे समाज संस्कृतीतून मूल खूप काही शिकते. तंत्रविज्ञान, विज्ञान, भाषा यात होणाऱ्या प्रगतीमुळे नव्या गरजा निर्माण होतात व त्यामुळे शिक्षणदेखील बदलावे लागते.