महात्मा गांधींची स्त्री दृष्टी : समानतेकडे वाटचाल
Keywords:
महिला सशक्तीकरण, शाश्वत विकास, लैंगिक समानता, गांधीजींचे विचारAbstract
सशक्तीकरण म्हणजे एक असे वातावरण तयार करणे ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या पुनर्मूल्यांकनासाठी वैयक्तिकरित्या किंवा एकत्रितपणे ती निर्णय घेऊन कार्य करू शकेल. आणि स्वतःची प्रगती करण्याकरता सहाय्य करू शकेल. ही एक बहुआयमी प्रक्रिया आहे. जी व्यक्ती किंवा जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांची संपूर्ण ओळख आणि शक्ती ओळखण्यास सुलभ करते. महिलांचे सक्षमीकरण हा देशाच्या जवळपास सर्व नेत्यांच्या महत्वपूर्ण अशी गरज आहे. ज्या बदल जागरूक होऊन आणि तत्पर होऊन कार्य करणे महत्वाचे आहे. आपल्या समाजात प्रचलित असलेल्या विविध सामाजिक दष्कत्यामुळे अजनही कित्येक महिलांना त्रास होत असल्याचे दिसन आले आहे. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण अनेक नियम तयार केले असले तरी, आपण महिलांच्या सक्षमीकरणापासून कोसो दूर आहोत. स्त्रियांच्या स्थितीत गेल्या काही स्थितीमध्ये पुरुषांच्या बरोबरीच्या दर्जापासून ते मध्ययुगीन कालखंडातील खालच्या टप्प्यापर्यंत अनेक सुधारकांच्या समान हक्कांच्या प्रचारापर्यंत अनेक मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. एकेकाळी महिलांना समाजातील दुर्बल घटक मानल्या जात होते. ज्यामळे महिला सक्षमीकरणाची उत्क्रांती झाली. महिला सक्षमीकरण हे मुळात महिलांना त्यांची मल्ये पाहण्याची, त्यांचा स्वाभिमान विकसित करण्याची क्षमता दर्शवते. या माध्यमातून महिलांना स्वतंत्र व्हा व त्यांच्या विकासासाठी काम करा त्यांचा आत्मविश्वास व्यवस्थापित करा आणि येणाऱ्या अडचणीवर मात करा ते आर्थिक विकास आणि कल्याणासाठी कार्य करा. असे गांधीजींचे मत होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शतकापूर्वी या क्षेत्रात प्रयोग करून महिलांच्या सक्षमीकरणाचा विकासाचा आणि त्यांच्या दर्जा सुधारण्याचा मार्ग दाखवला होता हे नीःसंकोच सांगता येईल. महात्मा गांधींनी आयुष्यभर सामाजिक दृष्ट्या दबलेल्या लोकांच्या उन्नतीसाठी खूप संघर्ष केला. भारतातील स्त्रियांच्या स्थितीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी ज्या प्रेरणादायी विचारसरणीने महिलांचे नैतिक आणि आरोग्य वाढवून त्यात सुधारणा करून त्यांचा स्वाभिमान शोधला. महात्मा गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी सामाजिक सुधारणांचे महान नेते होते. गांधीजींचे सामाजिक विचार भारतातील महिलांचे स्थान वाढवणारे व महिलांना मदत करणारे होते. सोबतच महिलांचा स्वाभिमान निर्माण करण्याकरता गांधींजीनी समाजातील प्रत्येक स्तरातील महिलांचा त्यांचा आवश्यकता समजून घेऊन मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहेत.