महात्मा गांधीजी आणि सर्वोदयाचे तत्त्वज्ञान
Keywords:
सशक्तीकरण, शाश्वत विकास, गांधीजींचे विचारAbstract
महात्मा गांधीजींचे सर्वोदय तत्त्वज्ञान म्हणजे सर्वांचा उदय, समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा मार्ग आहे. हे तत्त्वज्ञान सत्य, अहिंसा, श्रमसन्मान, ग्रामस्वराज्य आणि नैतिक अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. सत्य व अहिंसा समाजात न्याय, करुणा आणि सहकार्य वाढवतात. श्रमसन्मान आणि आर्थिक सुरक्षितता आत्मसन्मान देते. ग्राम स्वराज्य, स्थानिक स्वराज्य, आर्थिक स्वावलंबन पर्यावरणीय संवर्धनावर लक्ष केंद्रित करते. सर्वोदय तत्त्वज्ञान सामाजिक समावेश, सक्षमीकरण व स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देते. आधुनिक जगातील विषमता, हिंसा, पर्यावरणीय संकट याला सामोरे जाण्यासाठी गांधीजींचे सर्वोदय तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तत्त्वज्ञान नैतिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पुनर्रचनेचे मार्गदर्शन करते. सर्वोदय म्हणजे सर्वांचे कल्याण साधना ही व्यवस्था आहे. सर्वोदयात सर्वांना समान स्थान असते. कोणाचीही पिळवणूक होणार नाही, सर्वोदयात प्रत्येकजण स्वतःच्या श्रमातून निर्माण केलेल्या उत्पन्नाचा उपभोग घेईल. दुर्बलांचे शोषण केले जाणार नाही. सर्वोदय हा मानवाच्या विशिष्ट गट व हितसंबंधांचा विचार न करता संपूर्ण समुदायातील लोकांचा विचार करणारी व्यापक विचारधारा मांडली जाते.