आधुनिक संस्कृत नाटककार डॉ. रमा चौधरी यांच्या नाटकातील स्त्री-चित्रण

Authors

  • प्रा. झीनत शौकत मुलाणी Author

Keywords:

आधुनिक संस्कृत नाटककार स्त्री

Abstract

संस्कृत साहित्यात कवींप्रमाणेच कवयित्रींचीही एक प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन काळापासून स्त्रिया गद्य, पद्य, चम्पू, नाटय अशा विविध साहित्यप्रकारात आपले योगदान देत आल्या आहेत. प्रस्तुत शोधनिबंधात डॉ. रमा चौधरी यांच्या नाटकातील स्त्री-चित्रणाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या नाटकातून दर्शविलेल्या स्त्री-व्यक्तिरेखा पारंपारिक, सोशिक व केवळ चूल व मुल इतकेच मर्यादित न राहता स्त्रीचे स्वतःचे अस्तित्त्व, विचारस्वातंत्र्य, नेतृत्त्वगुण व निर्णयक्षमता यांचे प्रतीक म्हणून समोर येतात. स्त्रियांच्या अंतर्मनातील भावनिक संघर्ष, समाजाने लादलेली बंधने आणि स्त्रीचा आत्मसन्मान यांचे वास्तववादी चित्रण हे डॉ. रमा चौधरी यांच्या नाट्यलेखनाची वैशिष्टे आहेत. त्यांनी स्त्रीला सामाजिक परिवर्तनाची सक्रिय वाहक मानून आधुनिक संस्कृत नाट्यपरंपरेला नवचेतना देण्याचे काम केले आहे.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. झीनत शौकत मुलाणी

    सहाय्यक प्राध्यापक, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा.

Published

2025-12-20

How to Cite

आधुनिक संस्कृत नाटककार डॉ. रमा चौधरी यांच्या नाटकातील स्त्री-चित्रण. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 2585-2588. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1152

Similar Articles

1-10 of 230

You may also start an advanced similarity search for this article.