आधुनिक संस्कृत नाटककार प्रभाकर भातखंडेंच्या नाटकांतील स्त्री-चित्रण

Authors

  • प्रा. रुपाली रघुनाथ वाडेकर Author

Keywords:

आधुनिक संस्कृत नाटककार स्त्री

Abstract

प्रभाकर भातखंडे हे आधुनिक संस्कृत नाटककारांपैकी एक प्रख्यात नाटककार आहेत. त्यांनी संस्कृतमध्ये जवळपास २५ लघुनाटिका या सदरात मोडणाऱ्या एकांकिका लिहिलेल्या आहेत. त्यांच्या प्रकाशित एकांकिका पैकी एक पुस्तक ललनाख्यानम् या शीर्षकाचे आहे. त्या पुस्तकात ललनाख्यानम्, शिल्पगूढा आणि इति मानवीयम् अशी तीन नाटके आहेत. या तीनही एकांकिका नायिकाप्रधान आहेत. त्यांच्या या एकांकिका आजच्या एकविसाव्या शतकातील स्त्रियांचे प्रातिनिधित्व करतात. तसेच त्यांच्या नाट्यसप्तकम् या पुस्तकातील नृत्यकूटम् आणि ईशावास्यमिदम् या नाटकातील नायिका अनुक्रमे कलिका आणि गंधाली याही आधुनिक काळातील स्त्रिया आहेत. एकविसाव्या शतकातील स्त्री ही जीवनाच्या विविध स्तरांवर निरनिराळ्या आह्वानांना पेलत पुरुषाबरोबर खंबीरपणे उभी राहणारी स्त्री आहे. अबला, परावलंबी, पीडित या तिच्या गतकालीन प्रतिमेतून बाहेर पडत स्वतःला सक्षम आणि सबळ सिद्ध करणारी वीरांगणा आहे. भातखंडेंच्या नाटकांतील स्त्री-प्रतिमा ही अशीच आधुनिक स्त्रीची आहे. त्यांच्या उपरोक्त पाच नाटकांचा आढावा जरी घेतला तरी ही गोष्ट स्पष्ट होईल.

Downloads

Download data is not yet available.

Author Biography

  • प्रा. रुपाली रघुनाथ वाडेकर

    संस्कृत विभाग, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली.

Published

2025-12-20

How to Cite

आधुनिक संस्कृत नाटककार प्रभाकर भातखंडेंच्या नाटकांतील स्त्री-चित्रण. (2025). IIP: World Journal of Humanities and Social Sciences, 1(Issue - IV (October-December), 846-848. https://iipublications.com/iipwjhss/article/view/1151

Similar Articles

1-10 of 230

You may also start an advanced similarity search for this article.