प्राकृत नाट्य साहित्यातील स्त्री जीवन
Keywords:
प्राकृत नाट्य स्त्री जीवनAbstract
प्राचीन काळापासून नाटक हे एक मनोरंजनाचे अत्यंत प्रभावी साधन म्हणून समाजात प्रिय झालेले होते. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक जाती-धर्माच्या भाषा साहित्यामध्ये कथाकथन गायन, नृत्य, विविध आवाजाची नक्कल किंवा हावभाव जाणून हालचालीच्या माध्यमातून एखादया विषयाचे स्पष्टीकरण करण्याची पद्धत प्राचीन काळापासून केले जात असलेले दिसून येते. यातूनच नाटकाची निर्मिती झालेली दिसून येते. परंतु नाटयाचे प्रयोग हे राजदरबारापेक्षा किंया ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होत असत. संस्कृत नाटकात प्राकृतमध्ये राजा, राणी बोलत असत. यातूनच प्राकृत साहित्य निर्माण होत गेले. समाजात प्राकृत भाषा बोलणारा वर्ग अधिक होता. त्यामुळे भास, भवभूती, कालिदास इत्यादी सर्व प्रसिद्ध नाटककारांनी आपल्या नाटय ग्रंथात केलेला दिसून येतो. इ.स. ९ व्या शतकात होऊन गेलेले संस्कृत, प्राकृत भाषा पंडित राजशेखर यांनी ‘कर्पूरमंजरी’ हे प्राकृत भाषेतील पहिले सट्टक लिहिले.